News Flash

‘पॉपकॉर्न’मध्ये सिध्दार्थ दिसणार स्त्रीरुपात!

आपल्या अभिनयातील विविधतेसाठी प्रसिद्ध असलेला सिध्दार्थ जाधव हा मराठी चित्रपटसृष्टीतील बहुरंगी असा अभिनेता. सिद्धार्थने अनेक प्रकारच्या व्यक्तीरेखा त्याच्या सहज अभिनय शैलीच्या जोरावर...

| February 19, 2014 07:00 am


आपल्या अभिनयातील विविधतेसाठी प्रसिद्ध असलेला सिध्दार्थ जाधव हा मराठी चित्रपटसृष्टीतील बहुरंगी असा अभिनेता. सिद्धार्थने अनेक प्रकारच्या व्यक्तीरेखा त्याच्या सहज अभिनय शैलीच्या जोरावर लिलया पार पाडल्या. आत्तापर्यंत त्याने साकारलेल्या भूमिका पाहिल्या तर लक्षात येईल की पठडीतला ठराविक बाजाचा अभिनय न करता, त्याने सतत नाविन्यपूर्ण अशा व्यक्तीरेखा साकारल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून ‘पॉपकॉर्न’ या त्याच्या आगामी चित्रपटात तो स्त्रीची भूमिका साकारताना दिसणार आहे. सिद्धार्थला स्त्रीच्या भूमिकेत पाहणे खचीतच करमणुकीचे ठरणार आहे. चित्रपटातील काही दृश्ये साकारताना सिद्धार्थने स्त्रीचा वेष परिधान करणे गरजेचे होते. गजेंद्र आहिरे यांच्या या चित्रपटात सई ताम्हणकर, मनवा नाईक, आदिती भागवत आणि स्मिता तांबे या अभिनेत्री ग्लॅमरर्स अवतारात प्रेक्षकांसमोर येणार आहेत. याशिवाय मुक्ता बर्वेचा देखील बोल्ड अवतार पाहायला मिळणार आहे. गोव्याच्या सुंदर समुद्र किनारी शुटींग करण्यात आलेला हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 19, 2014 7:00 am

Web Title: actor siddharth jadhav performs woman character in popcorn
Next Stories
1 पाहा ‘बेवकुफियां’ चित्रपटातील ‘खामखां’ रॉमेन्टिक गाण्याचा व्हिडिओ
2 ‘बँग बँग’ चित्रपटात हृतिक रोशन स्वत: साकारणार थरारक दृश्ये
3 ‘शादी के साईड इफेक्ट्स’ एक हृदयस्पर्शी चित्रपट – फराहन अख्तर
Just Now!
X