05 March 2021

News Flash

अभिनेत्री म्हणते, “इंटिमेट सीन्स करून थकलेय, पण…”

अभिनेत्रीने व्यक्त केली खंत

चित्रपटसृष्टीत टिकून राहण्यासाठी कलाकरांना अनेकदा साचेबद्ध भूमिका, विशिष्ट चौकटीतून बाहेर पडून काम करावं लागतं. एखाद्या चित्रपटातील ठराविक भूमिका गाजल्यानंतर कलाकाराला त्याच पठदीतल्या भूमिका ऑफर केल्या जातात. याच गोष्टीला कंटाळल्याची भावना एका दाक्षिणात्य अभिनेत्रीने व्यक्त केली आहे. अभिनेत्री अँड्रिया जेरेमिया हिने आपल्या वाट्याला इंटिमेट सीन्स देणाऱ्या भूमिकाच येत असल्याची खंत व्यक्त केली.

अँड्रियाचा ‘वाडा चेन्नई’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटात तिने काही बोल्ड दृश्ये दिली. मात्र याचा पश्चात्ताप होत असल्याचं तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं. एका तामिळ मासिकाला दिलेल्या मुलाखतीत अँड्रिया म्हणाली, “चंद्रा या भूमिकेच्या वाट्याला बरेच बेडरुम सीन्स आले होते. ऑनस्क्रीन पती आमीर याच्यासोबत मी ‘वाडा चेन्नई’ चित्रपटात इंटिमेट सीन्स दिले होते. मात्र यानंतर मला त्याच पद्धतीच्या भूमिका मिळू लागल्या आहेत. मला आता अशा भूमिकांचा वैताग आला आहे. पुन्हा त्याच त्याच पद्धतीच्या भूमिका मी साकारणार नाही.” तुम्ही मला पैसे कमी द्या पण किमान चांगली भूमिका द्या, अशी विनंतीच तिने या मुलाखतीत केली.

वेत्री मारन यांचा ‘वाडा चेन्नई’ हा चित्रपट २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यावेळी हा चित्रपट तुफान गाजला. कॉलिवूडमधला सर्वोत्कृष्ट गँगस्टर चित्रपट म्हणून त्याची ओळख झाली. यामध्ये अँड्रियाने चंद्रा ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 29, 2020 4:16 pm

Web Title: actress regrets doing intimate scenes this is why ssv 92
Next Stories
1 Video : मृण्मयी सांगते, पहिल्यांदा दिग्दर्शन करण्याचा अनुभव
2 लतादीदी पडल्या ‘अंधाधून’च्या प्रेमात
3 अजिंक्य देवचं चार वर्षांनंतर मराठीत पुनरागमन
Just Now!
X