News Flash

अजय देवगणने खरेदी केला आलिशान बंगला ; बिग बींच्या नव्या घराहून दुप्पट किंमत!

मुंबईतील जूहू परिसरात अजय देवगणने नवा बंगला खरेदी केला आहे.

देशात महामारी सुरु असली तर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी मात्र मोठ्या प्रॉपर्टींमध्ये गुंतवणूक करताना दिसत आहेत. अनेक सेलिब्रिटींनी गेल्या काही दिवसात मुंबई आणि आसपासच्या भागात घर खरेदी केल्याचं पाहायला मिळतंय. जान्हवी कपूर, अर्जून कपूर, आलिया भट्ट आणि बिग बीनंतर आता बॉलिवूडच्या सिंघमने नवं घर खरेदी केलं आहे.

अभिनेता अजय देवगणने मुंबईतील जूहू परिसरात तब्बल ६० कोटींचा एक भव्य बंगला खरेदी केलाय. अजय देवगणचा सध्याच्या घराचं नाव शक्ती असून या घराच्या परिसरातच अजयने हा नवा बंगला विकत घेतला आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार हा बंगला ५ हजार ३१० चौरस फूट परिसरात पसरलेला आहे. अजय देवगणच्या काही जवळच्या व्यक्तींना या वृत्ताला दुजोरा दिला आहे. गेल्या काही वर्षांपासून काजोल आणि अजय देवगण मुंबईमध्ये नव्या घराचा शोध घेत होते. अखेर त्यांना ते सध्या राहत असलेल्या भागातच हे नवं घरं सापडलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

आणखी वाचा: “मला स्पर्धकांचं कौतुक करण्यास सांगितलं गेलं”, इंडियन आयडल शोबद्दल सुनिधी चौहानचा मोठा खुलासा

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यातच घर खरेदीचे व्यवहार सुरू झाल्याचं सांगण्यात आलं आहे. तर या महिन्याच्या सुरुवातीला अजय देवगण आणि त्याची आई वीणा विरेंद्र देवगण यांच्या नावावर हा बंगला ट्रान्सफर करण्यात आला आहे. अजय देवगणने बंगल्याचा ताबा घेतला असून सध्या बंगल्याच्या नूतनीकरणाचं काम सुरू करण्यात आलंय.

बिग बी अमिताभ बच्चन यांनी देखील २०२० सालामध्ये मुंबईत नवं घरं खरेदी केलं होतं. या घराची किंमत ३१ कोटी रुपये इतकी आहे. नुकतच या घराचं रिजिस्ट्रेशन करण्यातं आलं असून या घरासाठी अमिताभ यांनी ६२ लाख रुपये स्टॅम ड्युटी भरली असल्याचे समोर आलंय.

दरम्यान, येत्या काळात अजय देवगण ‘मैदान’, ‘भूज- द प्राईड ऑफ इंडिया’, ‘थँक गॉड’ या सिनेमांमध्ये मुख्य भूमिकेत झळकणार आहे. त्याचसोबत ‘गंगूबाई काठियावाडी’ आणि ‘आरआरआर’ या सिनेमातही अजय प्रमुख भूमिकेत पाहायला मिळेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2021 9:52 am

Web Title: ajay devgan bought new big bangalow in mumbai juhu for 60 crore kpw 89
Next Stories
1 टार्झनची भूमिका साकारणाऱ्या जो लारा यांचा विमान अपघातात मृत्यू
2 “मला स्पर्धकांचं कौतुक करण्यास सांगितलं गेलं”, इंडियन आयडल शोबद्दल सुनिधी चौहानचा मोठा खुलासा
3 राजकुमार रावकडून ‘करोना योद्ध्यां’ना अनोखी सलामी; शेअर केली खास कविता
Just Now!
X