आज १४ सप्टेंबर आहे, आजचा दिवस ‘जागतिक हिंदी भाषा दिन’ म्हणून साजरा केला जातो. जगभरात हिंदी भाषेचा प्रसार करण्याच्या उद्देशाने आजचा दिवस साजरा केला जातो. आज हिंदी भाषेतील कविता, शायरी, कथा कथन, काव्य संमेलन अशा विविध उपक्रमांद्वारे हिंदी साहित्यातील कर्तृत्ववान मंडळींना मानवंदना दिली जाते. सोशल मीडियावरही आजचा दिवस साजरा केला जात आहे.

बॉलिवूड अभिनेता अजय देवगण व रणदीप हुड्डा यांनी आपल्या ट्विटरच्या माध्यमातून समस्त भारतीयांना हिंदी दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. रणदीपने संत कबीर यांच्या शब्दात म्हणजेच ‘बुरा जो देखन मैं चलया, बुरा ना मिलया कोय।’ असे ट्विट करुन शुभेच्छा दिल्या. अजय देवगणने ‘हिंदी है हम, वतन है हिंदुस्तान हमारा’ असे ट्विट करुन शुभेच्छा दिल्या.

हिंदी ही भारतातील सर्वाधीक बोलली जाणारी भाषा आहे. बिहार, छत्तीसगढ, हरियाणा, हिमाचल प्रदेश, झारखंड, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांतील लोक सर्वसाधारपणे हिंदी भाषेचा वापर करतात. २०१६ मध्ये झालेल्या एका सर्वेक्षणानुसार भारतात तब्बल ७५ कोटी लोक हिंदी भाषेत बोलतात.