27 May 2020

News Flash

“मोदी म्हणजे ‘बिग बॉस’ आठवड्यातून एकदा देतात टास्क”

लॉकडाउनवरुन अभिनेत्याने लगावला मोदींना टोला

अभिनेता एजाज खान सध्या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. गेल्या काही काळात तो अभिनयापेक्षा आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळेच जास्त चर्चेत राहू लागला आहे. अलिकडेच त्याने करोना विषाणूवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोमणा मारला होता. आता पुन्हा एकदा त्याने मोदींवर निशाणा साधला आहे. मात्र यावेळी २१ दिवसांच्या लॉकडाउनवरुन त्याने कॉमेंट केली आहे.

काय म्हणाला एजाज?

“मोदीजी आपल्याला बिग बॉस खेळवत आहेत. आठवड्यातून एकदा येतात आणि नवा टास्क देऊन जातात.” अशा आशयाचे ट्विट एजाजने केले आहे.

यापूर्वी त्याने “सर्व दिवे विझवल्यामुळे करोनाला वाटेल आता भारतात कोणीच नाही. त्यामुळे तो भारत सोडून निघून जाईल. धन्यवाद मोदी जी.” अशा आशयाचे ट्विट करुन प्रतिक्रिया दिली होती.

एजाज खान एक टीव्ही अभिनेता आहे. त्याने या पूर्वी ‘अदालत’, ‘भाभी’, ‘केसर’, ‘कुसुम’, ‘क्या होगा निम्मो का?’ यांसारख्या अनेक लोकप्रिय टीव्ही मालिकांमध्ये लहानमोठ्या भूमिका साकारल्या आहेत. ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोमुळे तो पहिल्यांदा प्रकाशझोतात आला. मात्र गेल्या काही काळात तो आपल्या अभिनयापेक्षा सोशल मीडिया पोस्टमुळे जास्त चर्चेत राहू लागला आहे. करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर एजाजने केलेले हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2020 4:32 pm

Web Title: ajaz khan comments on narendra modi over coronavirus lockdown in india mppg 94
Next Stories
1 ‘मोदींवर टीका करणाऱ्यांनी काल-परवा casual leave घेतली होती का’?’
2 Video: सिगारेटचे व्यसन सोडवण्यासाठी कंगनाने लढवली ‘ही’ शक्कल
3 …म्हणून राम गोपाल वर्मा यांनी केले होते करोनाची लागण झाल्याचे ट्विट
Just Now!
X