18 January 2021

News Flash

‘कमिना’ म्हणत पत्रकाराने केला रणवीरचा अपमान

रणवीरला कमिना म्हटल्यामुळे अक्षय प्रचंड संतापला; म्हणाला...

रणवीर सिंग

अक्षय कुमारचा बहुप्रतिक्षीत ठरत असलेल्या ‘सूर्यवंशी’ या चित्रपटाता ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या ट्रेलरमध्ये मोठ्या प्रमाणावर अॅक्शन सीनचा भरणा करण्यात आला आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर हा ट्रेलर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, रणवीर सिंग आणि अजय देवगण झळकणार आहेत. त्यामुळे सध्या हे तिघंही चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ट्रेलर लॉन्चच्या वेळी त्यांनी पत्रकार परिषदही घेतली. यावेळी एका पत्रकाराने रणवीरला विचारलेला प्रश्न ऐकून अक्षय कुमार संतापल्याचं पाहायला मिळालं. इतकंच नाही तर ‘तुम्ही असा प्रश्न विचारु शकत नाही’, असं अक्षयने यावेळी सांगितलं.

अक्षय,अजय आणि रणवीर पत्रकारांशी गप्पा मारत असताना एका पत्रकाराने “रणवीर तू या इंडस्ट्रीमधला सगळ्यात मोठा कमिना आहेस”, असं तुला वाटतं का? असा प्रश्न एका रिपोर्टरने रणवीरला विचारला. त्याचा हा प्रश्न ऐकल्यानंतर अक्षय कुमार संतापल्याचं पाहायला मिळालं. “तुम्ही फार चुकीचं बोलत आहात. हा केवळ चित्रपटातील संवाद आहे. प्रत्यक्षात तसं नाहीये. तुम्ही दोन्ही गोष्टींचा संबंध जोडण्याचा प्रयत्न करु नका. त्यामुळे माझी विनंती आहे की तुम्ही असे प्रश्न विचारु नका”, असं अक्षय म्हणाला.

अक्षयच्या या उत्तरानंतर तेथील वातावरण काही काळ तंग झालं होतं. त्यामुळे वातावरण शांत करण्यासाठी रणवीरने त्याच्या मजेशीर अंदाजात विनोद करण्यास सुरुवात केली. “माझा अक्की, मला वाचविण्यासाठी कायम माझा अक्की येईल”, असं रणवीर म्हणाला.

दरम्यान, रोहित शेट्टी, ‘सूर्यवंशी’ या चित्रपटाचं दिग्दर्शन करत असून या चित्रपटामध्ये अक्षय कुमार मुख्य भूमिकेत झळकणार आहे. हा चित्रपट २४ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे २४ मार्च रोजी मुंबईतील चित्रपटगृह रात्रंदिवस खुले राहणार असून २५ तारखेला गुढीपाडव्याची सुट्टी आहे. त्यामुळे या दिवसांमध्ये सूर्यवंशी नक्की पाहा असं आवाहन ही लहान मुलं करत आहेत. तसंच चित्रपटाचा ट्रेलर २ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 3, 2020 11:15 am

Web Title: akshay kumar lashes out at reporter who calls ranveer singh kamina ssj 93
Next Stories
1 केतकी चितळेविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल
2 “विवाहित पुरुषाच्या प्रेमात कधीच पडू नका”; नीना गुप्ता यांचा चाहत्यांना सल्ला
3 Video : ट्रॅफिक आणि ‘मन फकिरा’ची कथा असं आहे यांचं खास कनेक्शन
Just Now!
X