PUBG हा भारतातील सर्वाधिक लोकप्रिय गेम्सपैकी एक म्हणून ओळखला जातो. देशातील जवळपास १० कोटी मोबाईल युझर्स पब्जी गेम खेळतात. या विदेशी गेमला टक्कर देण्यासाठी आता एक देसी गेम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘फौजी’ (FAU-G) असं या गेमचं नाव आहे. अभिनेता अक्षय कुमारने या नव्या कोऱ्या गेम्सचा टीझर ट्विट केला आहे.

अवश्य पाहा – “जातिनिहाय आरक्षण बंद करा”; कंगना रणौतची सरकारकडे मागणी

अक्षयने ट्विट केलेल्या या व्हिडीओमध्ये गलवान खोऱ्याचं दृष्य दिसत आहे. या खोऱ्यात भारत विरुद्ध चीन युद्ध सुरु आहे. भारतीय सैनिक चिनी सैनिकांवर हल्ला करताना दिसत आहेत. शिवाय भारताचा झेंडा देखील डौलाने फडकताना या व्हिडीओमध्ये दिसत आहे. फैजी हा गेम काही प्रमाणात पब्जीसारखाच आहे. परंतु निर्मात्यांनी भारतीय सैनिकांना केंद्रस्थानी ठेवून या गेमची निर्मिती केली आहे. त्यामुळे या गेममधून मिळणाऱ्या एकूण नफ्यापैकी २० टक्के नफा भारतीय आर्मीला देण्यात येईल. या गेमचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अवश्य पाहा – “माफी माग अन्यथा मानहानिचा दावा ठोकेन”; महेश भट यांच्या सुनेला अमायराचा इशारा

गेल्या काही दिवसांपासून भारत आणि चीनदरम्यान तणावाचे वातावरण आहे. काही दिवसांपूर्वी सुरक्षेच्या कारणास्तव केंद्र सरकारने काही चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा सरकारने ११८ अॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. यात तरुणांमध्ये सर्वात जास्त क्रेझ असलेल्या पबजी या गेमचाही समावेश आहे. माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६९ अ अंतर्गत पबजी मोबाइल गेमवर बंदी आणण्यात आली आहे. भारताचे सार्वभौमत्व, सुरक्षेशी संबंधित गोष्टींमध्ये सहभागी असल्याने ही कारवाई कऱण्यात आल्याचे मंत्रालयाने सांगितले आहे.