News Flash

65th national film awards : ‘न्यूटन’ला मिळालेलं यश छत्तीसगढमधल्या जनसामान्यांचं- अमित मसुरकर

छत्तीसगढच्या नक्षलवादी भागात होणाऱ्या निवडणुका आणि तिथलं भीषण वास्तव दर्शवणाऱ्या या चित्रपटात स्थानिकांनीही भूमिका साकारली.

अमित मसूरकर, राजकुमार राव

मराठमोळा दिग्दर्शक अमित मसूरकरच्या ‘न्यूटन’ या चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कार पटकावला आहे. बर्लिन, हाँगकाँग चित्रपट महोत्सवात गौरव झाल्यानंतर ऑस्करसाठीही भारताकडून हा चित्रपट पाठवण्यात आला होता. आता राष्ट्रीय पुरस्कारामुळे अभिनेता राजकुमार रावची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. हे यश छत्तीसगढमधल्या जनसामान्यांचं आहे, अशी प्रतिक्रिया अमित मसूरकरने दिली आहे.

छत्तीसगढच्या नक्षलवादी भागात होणाऱ्या निवडणुका आणि तिथलं भीषण वास्तव दर्शवणाऱ्या या चित्रपटात स्थानिकांनीही भूमिका साकारली. त्यातील बहुतांश भाग हा तिथेच चित्रीत करण्यात आला आहे. तिथल्या स्थानिकांनीही पहिल्यांदाच अशा प्रकारच्या चित्रपटात भूमिका साकारण्याचं धाडस दाखवल्याने हे यश त्यांचंच आहे, असं मसूरकर म्हणतो. त्यासोबतच हे यश येत्या काळात राजकीय दृष्टीकोनानेही महत्त्वाच्या अशा चित्रपटांचं वेगळं स्थान निर्माण करेल यासाठी आपण आशावादी असल्याचंही तो या पोस्टमधून म्हणाला.

वाचा : ‘पावसाचा निबंध’च्या नावानं चांगभलं- नागराज मंजुळे 

अमित मसूरकर दिग्दर्शित हा दुसरा चित्रपट आहे. या चित्रपटातून लोकशाही व्यवस्था आणि निवडणुका ही आपल्या समाजव्यवस्थेची दरवर्षी रंगणारी सर्कस दाखवताना त्याने व्यवस्थेतील मूळ विसंगतीवरच अचूक बोट ठेवले आहे. ‘न्यूटन’ हा चित्रपट चर्चेत येण्याचं आणखी एक कारण म्हणजे यामध्ये मुख्य भूमिका साकारत असलेला अभिनेता राजकुमार राव. चौकटीबाहेरच्या भूमिका स्विकारणाऱ्या या दमदार अभिनेत्याला प्रेक्षक- समीक्षकांकडून दाद मिळाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 13, 2018 5:43 pm

Web Title: amit masurkar reaction on getting national award for his film newton
Next Stories
1 …जेव्हा बॉलिवूडचा खिलाडी साताऱ्याच्या उदयनराजे भोसलेंना भेटतो
2 A Kid Like Jake : दुसऱ्या हॉलिवूडपटाच्या ट्रेलरमध्येही अवघ्या काही सेकंदांसाठी झळकली ‘देसी गर्ल’
3 परीक्षेला जाण्यापूर्वीच पास झाला हा ‘कच्चा लिंबू’
Just Now!
X