बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी विधू विनोद चोप्रांच्या ‘दो’ या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात केली आहे. बिजॉय नांबियार या चित्रपटाचे दिग्दर्शन करित आहेत. चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्याबरोबर फरहान अख्तर आणि अदिती राव हैदरीदेखील काम करीत आहेत. चित्रपटाची कथा एका बुद्धिबळपटूच्या अवतीभोवती फिरते. चित्रपटाच्या शुटिंगविषयी अमिताभ आपल्या ब्लॉगवर लिहितात, विधू विनोद चोप्रा निर्मित चित्रपटाचे पहिले चित्रीकरण आम्ही सर्वांनी एकत्र केले. चित्रपटाचे दिग्दर्शक बिजॉय नांबियार आणि बरोबर फरहान अख्तर आणि अदिती राव हैदरीसुद्धा होते. अभिनेता फरहान अख्तरनेदेखील टि्वटरवर चित्रपटाविषयी आणि अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम करताना आलेला उत्साही अनुभव व्यक्त केला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 30th Sep 2014 रोजी प्रकाशित
विधू विनोद चोप्रांच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगला बिग बींकडून सुरूवात
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी विधू विनोद चोप्रांच्या 'दो' या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात केली आहे. बिजॉय नांबियार या चित्रपटाचे दिग्दर्शन करित आहेत.

First published on: 30-09-2014 at 07:19 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amitabh bachchan begins shooting with farhan aditi for vidhu vinod chopras next