जीवनात थोड्या प्रमाणात गडबड-गोंधळ हवाच, असे बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचे मानणे आहे. सध्या अहमदाबाद येथे सुरू असलेल्या सुरजित सिरकर दिग्दर्शित ‘पिकू’ चित्रपटाच्या चित्रीकरणात अमिताभ बच्चन व्यग्र आहेत. चित्रीकरणाच्या ठिकाणी सुरू असलेल्या गोंधळाच्या वातावरणात चित्रपटातील आपल्या संवादाचा सराव करण्यात मजा येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
एकांतात लिहिलेल्या शब्दांनी समर्पक परिणाम साधता येतो. असे असले तरी, वाहतुकीच्या गडबड-गोंधळात लिहिलेले शब्द माझ्यासाठी चांगला परिणाम साधतात – जीवनात थोड्या प्रमाणात गडबड-गोंधळ हवा, मात्र काही प्रमाणात ते नियंत्रितदेखील हवे. बाकीच्यांचे मला माहिती नाही, परंतु, माझ्या मते प्रत्येक वेळी एकांतातच तुमच्यातील प्रतिभा बाहेर येते असे नाही, असा संदेश अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगमध्ये लिहिला आहे.
ब्लॉगमध्ये ते पुढे लिहितात, कधी-कधी आजूबाजूच्या वातावरणात असलेल्या थोड्या-फार प्रमाणातील गडबड-गोंधळाने मदतच होते – खास करून जेव्हा आम्ही कॅमेऱ्यासमोर आमच्या संवादाचा सराव करीत असतो… संवाद म्हणताना आम्ही केलेल्या चुका सेटवरील गडबड-गोंधळात कोणाच्या कानावर पडत नाहीत… म्हणून मला सेटवर गोंधळ सुरू असताना सराव करायला आवडते… फक्त सराव हं… अन्य काही नाही.
‘पिकू’ चित्रपटात दीपिका पदुकोण आणि इरफान खान यांच्यसुद्धा भूमिका आहेत.