बिग बी अमिताभ बच्चन मंगळवारी कोलकातामध्ये लहान मुलांबरोबर फुटबॉल खेळण्यासाठी मैदानात उतरले होते. अमिताभ सध्या कोलकातामध्ये ‘टीई३एन’च्या चित्रीकरणात व्यस्त आहेत. दरम्यान, चित्रीकरणासाठी ते येथील मोहम्मडन स्पोर्टस क्लबच्या मैदानावर आले होते. टी-शर्ट, ट्राउजर आणि मानेभोवती मफलर गुंडाळलेल्या वेषात अमिताभ सकाळी आठच्या आसपास याठिकाणी आले. त्यानंतर क्लबच्या परिसरात अमिताभ यांच्या दृश्यांचे चित्रीकरण करण्यात आले. यावेळी चित्रीकरणादरम्यानच्या फावल्या वेळेत अमिताभ यांनी फुटबॉल खेळण्याची हौस भागवून घेतली. काही दिवसांपूर्वी याच चित्रपटाच्या चित्रीकरणाच्यावेळी सेटवर अमिताभ यांच्या बरगड्यांना दुखापत झाली होती. परंतु, काळजी करण्याचे कारण नसल्याचे सांगत त्यांनी आपल्या चाहत्यांना आश्वस्त केले होते. मात्र, मंगळवारी अमिताभ मैदानावर ज्याप्रकारे फुटबॉल खेळत होते त्यावरून ते सध्या पूर्णपणे फिट असल्याचे जाणवले.
संग्रहित लेख, दिनांक 13th Jan 2016 रोजी प्रकाशित
अमिताभ बच्चन लहानग्यांसोबत फुटबॉल खेळतात तेव्हा…
काही दिवसांपूर्वी याच चित्रपटाच्या चित्रीकरणाच्यावेळी सेटवर अमिताभ यांच्या बरगड्यांना दुखापत झाली होती
Written by लोकसत्ता टीम

First published on: 13-01-2016 at 11:45 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amitabh bachchan plays football with kids in kolkata