News Flash

बिग बींनी शेअर केला अभिषेकसोबतचा फोटो; म्हणाले…

पाहा, बिग बींनी शेअर केलेला फोटो

बॉलिवूडचा शहेनशहा म्हणजेच अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रीय असल्याचं पाहायला मिळतं. ट्विट किंवा इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ते कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे ते बऱ्याचदा त्यांच्या कुटुंबियांसोबतचे फोटो, व्हिडीओ किंवा त्यांचे विचार शेअर करताना दिसतात. यावेळी मात्र, त्यांनी त्यांच्या लेकासोबत म्हणजेच अभिषेक बच्चनसोबत एक फोटो शेअर केला आहे.
बिग बींनी शेअर केलेला फोटो सध्या चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. या फोटोमध्ये अमिताभ बच्चन आणि लहानपणीचा अभिषेक दिसून येत आहे. बिग बींनी दोन फोटो कोलाज केले आहेत.

यातील एक फोटो सध्याच्या काळातला असून दुसरा फोटो अभिषेक लहान असतानाचा आहे. या दोन्ही फोटोच्या माध्यमातून त्यांनी काळ कसा पटकन पुढे सरकतो हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

 

View this post on Instagram

 

… then .. and then

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan) on


दरम्यान, बिग बी अनेकदा त्यांच्या मुलांसोबतचे फोटो शेअर करत असतात. यापूर्वीदेखील त्यांनी अभिषेक आणि श्वेतासोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत. सध्या बिग बी ‘कौन बनेगा करोडपती’ या शोचं सूत्रसंचालन करताना दिसत आहेत. त्याचप्रमाणे लवकरच ते ‘ब्रह्मास्त्र’,’ चेहरे’ आणि ‘झुंड’ या चित्रपटात झळकणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2020 5:44 pm

Web Title: amitabh bachchan recalls fond memories abhishek bachchan he shares then now pictures him dcp 98
Next Stories
1 निक्की तांबोळीने पँटमध्ये लपवला मास्क; भडकलेल्या नेटकऱ्यांनी घेतला समाचार
2 “पेंग्विनसारखा दिसतो तर पेंग्विनच म्हणणार आणि पप्पूसारखं काम केलं तर पप्पूच म्हणणार ना”
3 यश मिळवण्यासाठी काहीही; ज्योतिषाच्या सांगण्यावरुन ‘या’ अभिनेत्रीनं बदललं स्वत:चं नाव
Just Now!
X