05 June 2020

News Flash

Coronavirus: मोठमोठ्या कलाकारांनी मदत केली तर बिग बी अजून गप्प का? महानायकाने दिलं उत्तर..

नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगला बिग बींचं मार्मिक उत्तर

अमिताभ बच्चन

करोना विषाणूशी दोन हात करण्यासाठी सर्वच क्षेत्रांतून मदतीचा ओघ येऊ लागला आहे. अनेक दाक्षिणात्य कलाकारांनी सढळ हाताने मदत केली तर अक्षय कुमारने तब्बल २५ कोटी रुपयांची मदत केली. काहीजण रोजंदारी कामगारांच्या मदतीला धावले. अशातच अमिताभ बच्चन गप्प का आहेत, असा सवाल नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर केला. नेटकऱ्यांच्या या ट्रोलिंगला महानायकाने उत्तर दिलं आहे.

इन्स्टाग्रामवर चार ओळी पोस्ट करत बिग बींनी नेटकऱ्यांना उत्तर दिलं आहे. ‘एकाने दिलं आणि म्हटलं की दिलं.. दुसऱ्याने दिलं पण म्हटलं नाही की दिलं…मला दुसऱ्या श्रेणीतच राहू द्या…ज्यांना मदत मिळाली त्यांना कुठे माहित की कोणी दिलं? त्यांची फक्त करुण कहाणी समजून घ्या. अशा परिस्थितीत आणखी काय म्हणावं…जे मला ओळखतात त्यांना ठाऊक आहे की मी मितभाषी आहे,’ असं त्यांनी लिहिलं.

View this post on Instagram

एक ने दिया और कह दिया, कि दिया, दूसरे ने दिया और कहा नहीं, कि दिया, दूसरी श्रेणी में ही रहने दो मुझे ऐ प्रीयजन , जिसे मिला, वो क्या जाने किसने दिया; जानो उसका बस करुण क्रंदन । इन हालातों में और क्या कहा जाए , जो जानें मुझे , जानें , मैं तो सदा स्वभाव से ही रहा हूँ कमसुख़न ! ( कमसुख़न : कम बोलने वाला ) ~ अमिताभ

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan) on

आर्थिक मदत केल्यानंतर त्याचा गाजावाजा करणं आवडत नाही असं बिग बींनी या ओळींतून स्पष्ट केलं. बिग बींनी लिहिलेल्या या ओळींची सोशल मीडियावर फार प्रशंसा होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 30, 2020 6:49 pm

Web Title: amitabh bachchan shares beautiful poem on corona donation ssv 92
Next Stories
1 चीन प्राण्यांसाठी सर्वात वाईट देश; रविनाने व्यक्त केला संताप
2 Video : सतीश राजवाडेंचा लाडक्या लेकीसोबत रंगला भातुकलीचा खेळ
3 करोनाशी लढण्यासाठी कार्तिकने दिला मदतीचा हात; केली इतक्या कोटीची मदत
Just Now!
X