News Flash

“तीन वेळा पाहिला, आज चौथ्यांदा पाहणार”- अमिताभ बच्चन

अमिताभ-जया मुव्हीडेटवर, पाहणार 'हा' चित्रपट

बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन आज आपल्या पत्नीचा ७३वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांच्या पत्नी, अभिनेत्री, खासदार जया बच्चन यांचा आज वाढदिवस. त्याचसोबत नुकताच या दोघांचा मुलगा अभिनेता अभिषेक बच्चन याचा नवा चित्रपटही प्रदर्शित झाला आहे. त्यातलं अभिषेकचं काम पाहून अमिताभ भलतेच खूश झाले असून त्यांनी जया यांना वाढदिवसानिमित्त हा चित्रपट दाखवण्याचं प्लॅनिंगही केलं आहे.

नुकताच अभिषेक बच्चनचा ‘बिग बुल’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. यातलं अभिषेकचं काम अमिताभ यांना फारच आवडलं. त्यांनी ट्विट करत हे सांगितलंही. त्यांनी हा चित्रपट तीन वेळा पाहिल्याचं सांगितलं. अभिषेकचं कौतुक करतानाच अमिताभ यांनी जया यांच्यासोबतचा एक जुना फोटो पोस्ट करत आपण चौथ्यांदा हा चित्रपट बघणार असल्याचं सांगितलं आहे.या फोटोवरुन अमिताभ आणि जया एकत्र हा चित्रपट पाहणार असा अंदाज लावता येऊ शकतो.

अभिषेकचा हा चित्रपट पाहिल्यानंतर अमिताभ यांनी आपल्या ब्लॉगवरुन त्याविषयी लिहिलं आहे. ते म्हणतात, “मुलं कायमच आपला सगळ्यात नाजूक विषय असतात आणि जेव्हा ते असं काहीतरी करतात, तेव्हा अभिमानाने छाती फुलून येते. मी इतर वडिलांपेक्षा काही वेगळा नाही. अशा पद्धतीची प्रगती पाहून अभिमान वाटतो.”

अमिताभ अभिषेकच्या या नव्या चित्रपटाबद्दल सतत काही ना काही तरी शेअर करत होते. याचं पोस्ट, टीझर त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन वेळोवेळी शेअर केला होता. अमिताभ सोशल मीडियावर बरेच ऍक्टिव्ह आहेत. ते नित्यनेमाने टम्बलर ब्लॉगही लिहित असतात.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2021 5:25 pm

Web Title: amitabh jaya are going to see abhisheks new movie together vsk 98
Next Stories
1 रुग्णसंख्या महाराष्ट्रात जास्त, मग लसींचा पुरवठा कमी का? या अभिनेत्याचा सवाल; राजकारण्यांचीही केली कानउघडणी
2 जया बच्चन ‘या’ नावाने चिडवतात ऐश्वर्याला, मुलाखतीमध्ये केला होता खुलासा
3 वडिलांच्या आठवणीत इरफान खानच्या मुलाला स्टेजवरच कोसळले रडू
Just Now!
X