News Flash

‘कबीर सिंग’मधील गाण्याविषयी अमृता फडणवीस म्हणतात..

'कबीर सिंग' या चित्रपटातील 'तेरा बन जाऊंगा' या गाण्याचं फिमेल व्हर्जन नुकतंच लाँच करण्यात आलं. हे गाणं अमृता फडणवीस यांच्या आवाजात रेकॉर्ड करण्यात आलं.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचं संगीतप्रेम सर्वश्रुत आहे. ‘कबीर सिंग’ या चित्रपटातील ‘तेरा बन जाऊंगा’ या गाण्याचं फिमेल व्हर्जन नुकतंच लाँच करण्यात आलं. हे गाणं अमृता फडणवीस यांच्या आवाजात रेकॉर्ड करण्यात आलं. कव्हर व्हर्जनसाठी त्यांनी ‘कबीर सिंग’मधील हेच गाणं का निवडलं आणि त्यांना या गाण्याविषयी काय वाटतं हे त्यांनी ‘लोकसत्ता ऑनलाइन’शी बोलताना सांगितलं.

“कबीर सिंग चित्रपटातील सर्वच गाणी हिट झाली. कव्हर व्हर्जनसाठी मला जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा मी लगेच ‘तेरा बन जाऊंगा’ हे गाणं निवडलं. कारण मला मनापासून हे गाणं आवडलं होतं. कव्हर व्हर्जनसाठी मी ते गाणं माझ्या पद्धतीने गाण्याचा प्रयत्न केला आणि ते रेकॉर्ड करतानाही खूप मजा आली,” असं अमृता म्हणाल्या.

अमृता यांच्या मुलीनेही हे गाणं ऐकलं असून तिलाही ते खूप आवडल्याचं त्यांनी सांगितलं. त्याचसोबत देवेंद्र फडणवीस यांना हे गाणं पाठवलं होतं. पण ते यात्रेत असल्याकारणाने अजून पाहू शकले नाहीत, असं त्या म्हणाल्या. यावेळी त्यांनी ‘कबीर सिंग’मधील गाण्यांचं फार कौतुक केलं. बऱ्याच दिवसांनी अशाप्रकारची गाणी ऐकायला मिळाली, असं मत त्यांनी व्यक्त केलं.

अमृता फडणवीस यांनी याआधी महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबतही एक गाणं गायलं होतं. व्यग्र वेळापत्रकामुळे ते गाण्याला फार वेळ देऊ शकत नाहीत. पण दिवसातून किमान एक तास तरी गाण्यासाठी काढत असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी ‘तुम जो मिल गए हो’ या जुन्या गाण्याचं रिक्रिएट व्हर्जन त्यांना गायला आवडेल अशी इच्छाही व्यक्त केली.

अमृता यांचं ‘तेरी बन जाऊंगी’ ह्या गाण्याला युट्यूबवर ५० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2019 4:16 pm

Web Title: amruta fadnavis on the song from kabir singh ssv 92
Next Stories
1 Photo: संजय नार्वेकर ‘बिग बॉस’च्या घरात
2 ‘बिग बॉस १३’मध्ये दिसणार ‘हे’ स्पर्धक?
3 Video : कोल्हापुरात गुडघाभर पाण्यात राणादा आणि पाठक बाई
Just Now!
X