05 March 2021

News Flash

अमृताचा ‘फोटो विथ शाहीद’!

मराठी सिनेसृष्टीतील ग्लॅमडॉल अमृता खानविलकर नुकतीच नच बलिये ७ची विजेती ठरली. अमृता एक उत्कृष्ट अभिनेत्री तर आहेच पण त्यासोबतच ती उत्तम नृत्यांगना आहे.

मराठी सिनेसृष्टीतील ग्लॅमडॉल अमृता खानविलकर नुकतीच नच बलिये ७ची विजेती ठरली. अमृता एक उत्कृष्ट अभिनेत्री तर आहेच पण त्यासोबतच ती उत्तम नृत्यांगना आहे.  गोलमाल या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरवात करणाऱ्या अमृताला नटरंग चित्रपटातल्या जाऊ द्या न घरी लावणीतून  प्रचंड लोकप्रियता मिळाली. नृत्यावर आधारित असलेल्या अनेक डान्स रिआलिटी शो मधून आपल्याला तिच्या नृत्याची झलक पाहायला मिळाली. नच बलिये ७ मध्येही तिने स्वतः तर नृत्यावर विशेष मेहनत घेतली. पण, त्यासोबतच ती हिमांशूची स्ट्रीक टीचर झाली. आणि आता पुन्हा एकदा झलक दिख ला जा या डान्स रिआलिटी शो मधून ती भेटणार आहे. झलकच्या तीन का तडका या कन्सेप्टच्या आधारे सेलिब्रेटी गेस्ट एन्ट्री होणार आहे. आणि  सेलिब्रेटी गेस्ट  म्हणून अमृता खानविलकर स्पर्धक नेहा मर्दा आणि नृत्य दिग्दर्शक रजित यांच्यासोबत परफॉर्म करणार आहे. ‘बेहेने दे’ या  ‘रावण’ सिनेमातल्या गाण्यावरती हे तिघे नृत्य करणार असून तीन नद्यांचा संगम यातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. यावेळी अमृताने अभिनेता आणि शोचा परी७क शाहीद कपूरसह फोटो काढण्याची संधीदेखील दवडू दिली नाही. ‘झलक दिखला जा’ हा भाग आपल्याला येत्या शनिवारी ९  वाजता दाखवण्यात येणार आहे.   “मला झलक मध्ये सेलिब्रेटी गेस्ट म्हणून बोलावण्यात आलं त्याचा मला खूप आनंद होत आहे. आमचा परफॉरमन्स चांगला व्हावा यासाठी नेहा, रजित आणि मी देखील खूप मेहनत घेतली आहे, अशी प्रतिक्रिया अमृताने यावेळी दिली.
येत्या वर्षात आपल्याला अमृताचे बिग बजेट सिनेमे पाहता येणार आहेत. त्यापैकी कट्यार काळजात घुसली, वन वे तिकीट, ऑटोग्राफ या सिनेमांमध्ये आपण अमृताला पाहू शकणार आहोत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2015 12:37 pm

Web Title: amruta khanvilkar will be seen in jhalak dikhala ja
Next Stories
1 .. म्हणून शाहीद वाढवतोय दाढी
2 माझे घर ‘कल्याण’
3 ‘लतादीदी आणि रागदारी’
Just Now!
X