‘अक्सर’ हा बॉलिवूडमधील आजवरच्या सर्वाधिक लोकप्रिय एरॉटिक मिस्ट्री चित्रपटांपैकी एक म्हणून ओळखला जातो. जबरदस्त गाणी आणि अफलातून पटकथा यांच्या जोरावर या चित्रपटानं २००६ साली अक्षरश: धुमाकूळ घातला होता. परंतु ‘अक्सर’चा दुसरा भाग मात्र सुपरफ्लॉप ठरला. अन् या अपयशाचं खापर निर्मात्यांनी दिग्दर्शक अनंत महादेवन यांच्यावर फोडलं. निर्मात्यांच्या या आरोपांवर त्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘अक्सर -२’ स्विकारणं ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती, असा टोला त्यांनी लगावला आहे.

अवश्य पाहा – हॉट आणि ब्युटीफूल… नुशरतच्या बिकिनी लूकबरोबरच टॅटूवरही चाहते झाले फिदा

‘स्कॅम १९९२’ या वेब सीरिजसाठी सध्या अनंत महादेवन यांची प्रचंड स्तुती केली जात आहे. या सुपरहिट वेब सीरिजच्या निमित्ताने बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ‘अक्सर २’ या चित्रपटावर भाष्य केलं. ते म्हणाले,

अवश्य पाहा – “पाकिस्ताननं चोरी केली”; ‘साराभाई वर्सेस साराभाई’ची नक्कल पाहून निर्माता संतापले

“अक्सर हा चित्रपट सुपरफ्लॉप ठरला याला माझ्यासोबतच निर्माते देखील जबाबदार आहेत. ज्याक्षणी पटकथा पाहिली तेव्हाच या चित्रपटात फारसा दम नाही हे मी निर्मात्यांना स्पष्ट शब्दात सांगितलं होतं. शिवाय पटकथेत काही सुधार करण्याचाही सल्ला दिला होता. परंतु लेखकाचे पैसे वाचवायचे होते त्यामुळे त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. शिवाय माझ्या कामाचे पैसे देखील अडवून ठेवले. माझ्यासोबत त्यांनी ३५ लाख रुपयांचा करार केला होता. पण त्यापैकी केवळ २० लाख रुपयेच मला मिळाले. उर्वरीत पैसे अद्याप मिळालेले नाहीत. पैसे केवळ मार्केटिंगवर खर्च करण्याऐवजी चित्रपटाच्या निर्मितीवर खर्च केले असते तर कदाचित अक्सर २ ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असता. ‘अक्सर -२’ स्विकारणं ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती असं मला वाटतं.” असा अनुभव अनंत महादेवन यांनी सांगितला.