News Flash

“…तर सुशांतने तेव्हाच आत्महत्या केली असती”; अंकिता लोखंडेचा खुलासा

अंकिता लोखंडेने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सुशांतविषयी बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण दिवसेंदिवस गुंतागुंतीचं होत आहे. अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर सुशांतच्या खासगी आयुष्याविषयी बरेच प्रश्न निर्माण झाले आहेत. अशातच त्याची एक्स गर्लफ्रेंड व अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सुशांतविषयी बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला. सुशांत नैराश्यात जाणारा व्यक्ती नव्हता, हे तिने वारंवार या मुलाखतीत सांगितले.

‘पवित्र रिश्ता’ या मालिकेमुळे सुशांत आणि अंकिताची पहिल्यांदा ओळख झाली आणि याच मालिकेत एकत्र काम करताना हे दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. सुशांत आणि अंकिता जवळपास सहा वर्षे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. सुशांतचा स्वभाव, त्याच्या बारिकसारिक गोष्टी माहित असल्याचं अंकिताने सांगितलं. ती म्हणाली, “एका ठराविक वेळेनंतर आम्हा दोघांना पवित्र रिश्ता ही मालिका सोडायची होती. चित्रपटांत काम करण्याच्या हेतूने सुशांतने आधी मालिका सोडली. त्यावेळी मी अजूनही मालिकेत काम करत होते. चित्रपटात काम मिळेपर्यंत आणि मालिका सोडल्यानंतर जवळपास तीन वर्षे सुशांत घरीच होता. त्याच्या हातात कोणतंही काम नव्हतं. तो फक्त चांगल्या संधीची वाट पाहत होता आणि स्वत:च्या अभिनय कौशल्यावर काम करत होता. जर नैराश्यामुळे आणि काम मिळत नसल्यामुळे त्याच्या आत्महत्या करायची असती तर त्याने तेव्हाच केली असती. तेव्हा तर त्याच्याकडे काहीच नव्हतं. मी शूटिंगला जायचे आणि तो घरी एकटाच असायचा.”

मार्च २०१६ मध्ये सुशांत आणि अंकिताचं ब्रेकअप झालं. त्यानंतर सुशांतला कधीच संपर्क केला नसल्याचं अंकिताने सांगितलं. त्याचप्रमाणे सुशांतची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला कधीच कोणत्या कार्यक्रमात किंवा पार्टीत भेटलं नसल्याचं तिने स्पष्ट केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2020 11:21 am

Web Title: ankita lokhande on sushant singh rajput suicide case ssv 92
Next Stories
1 आफताब शिवदासानीच्या घरी चिमुकलीचं आगमन
2 अनुपम श्यामसाठी योगी सरकार मदतीसाठी सरसावले; मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले आदेश
3 …म्हणून आदित्य ठाकरेंनी मानले अक्षय कुमारचे आभार
Just Now!
X