24 November 2020

News Flash

घसरणाऱ्या अर्थव्यवस्थेवरुन अनुराग कश्यपचा केंद्राला टोला; म्हणाला…

मोदी सरकारसमोर अर्थसंकट गडद

भारतीय अर्थव्यवस्थेला करोनाचा मोठा फटका बसला आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाकडून (NSO) जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीत एप्रिल ते जून २०२० या तिमाहीत तब्बल २३.९ टक्क्यांनी घट झाली आहे. सलग दोन तिमाहींमध्ये जीडीपीत घट आहे. दरम्यान भारताच्या या आर्थिक परिस्थितीवर बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप याने प्रतिक्रिया दिली आहे. “कहानी घर घर की” असं ट्विट करत त्याने केंद्र सरकारवर उपरोधिक टोला लगावला आहे.

“लडेंगे साथी जीतेंगे साथी”; डॉ. काफिल खान यांच्या सुटकेवर अभिनेत्याने व्यक्त केलं समाधान

“तुझं डोकं ठिकाणावर आहे का?” विचित्र फोटोमुळे अभिनेत्रीला केलं जातंय ट्रोल

अनुराग कश्यप सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. समाजात घडणाऱ्या विविध घडामोडिंवर तो आपली मतं रोखठोकपणे मांडतो. यावेळी त्याने भारताच्या घसरत जाणाऱ्या अर्थव्यवस्थेवरुन सरकारवर निशाणा साधला आहे. “कहानी घर घर की” असं ट्विट करत त्याने केंद्र सरकारवर उपरोधिक टोला लगावला आहे. त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. यापूर्वी अभिनेते शत्रूघ्न सिन्हा यांनी देखील सरकारवर टीका केली होती. “कृपया या परिस्थितीसाठी आता देवाला जबाबदार धरु नका” असा टोला त्यांनी लगावला होता.

भारताच्या वास्तविक (रियल) जीडीपीमध्ये २६.९ लाख कोटींची घट झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ही घट २३.९ टक्के इतकी आहे. नाममात्र (नॉमिनल) जीडीपी ३८.०८ लाखांनी घसरला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ही घट २२.६ टक्के इतकी आहे. २२.८ टक्क्यांनी अर्थव्यवस्थेची सरासरी घसरण झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2020 4:17 pm

Web Title: anurag kashyap reaction on gdp mppg 94
Next Stories
1 “लडेंगे साथी जीतेंगे साथी”; डॉ. काफिल खान यांच्या सुटकेवर अभिनेत्याने व्यक्त केलं समाधान
2 ती व्यक्ती मुलींसाठी फार धोकायदायक; राम कदमांचे आभार मानणाऱ्या कंगनाला काँग्रेसचा सल्ला
3 ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित चित्रपटांनाही अनुदान द्या; अक्षय बर्दापूरकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Just Now!
X