News Flash

अनुराग म्हणाला…तू ‘लेडी नवाजुद्दीन’-अमृता सुभाष

अमृताने सांगितल्या शुटिंगच्या गंमती

तू लेडी नवाजुद्दीन आहेस असं मला अनुराग कश्यपने सांगितल्याचं अभिनेत्री अमृता सुभाषने सांगितलं आहे. ‘Choked’ सिनेमाच्या शुटिंगदरम्यान अनुरागने मला हे वारंवार सांगितलं की तू लेडी नवाजुद्दीन आहेस आता यापुढे मी तुला सिनेमात कास्ट करणार नाही. कदाचित अजून अनुरागला माझा कंटाळा आलेलानाही. त्यामुळे त्याच्या पुढच्या सिनेमातही मी असेन अशी आशा आहे असंही अमृताने म्हटलं आहे. इंडियन एक्स्प्रेसने नुकतीच Choked या सिनेमातील कलाकारांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. त्यावेळी अमृताने हे वक्तव्य हसत हसत केलं आहे.

नेटफ्लिक्सवर Choked हा सिनेमा रिलिज झाला. या सिनेमात अमृता सुभाष आणि इतर कलाकारांच्या भूमिका आहेत. आत्तापर्यंत अनुराग कश्यप दिग्दर्शित रमन राघव २.० या सिनेमात, सेक्रेड गेम्स या वेबसीरिजमध्ये अमृता सुभाषने भूमिका केल्या आहेत. अमृताने गली बॉयमध्ये साकारलेल्या भूमिकेचंही कौतुक झालं.

Choked या सिनेमाबाबत बोलताना अमृता म्हणाली.. “हा सिनेमा माझ्यासाठी एक वेगळा अनुभव होता. या सिनेमातल्या माझ्या भूमिकेला थोडी विनोदाचीही झालर आहे. तसंच माझा रोल काहीसा गोंधळात टाकणाराही आहे. तिच्या भूमिकेला अनेक छटा आहेत. त्या रंगवताना मला मजा आली. ती सच्ची आहे की लुच्ची आहे असं तुम्ही ही भूमिका पाहून ठरवू शकत नाही. जेव्हा मी भूमिका करताना काही अॅडिशन्स घेत होते तेव्हा अनुरागला हसू यायचे. तो हसू आवरत नव्हता आणि मी माझ्या भूमिकेत माझ्या पद्धतीने रंग भरत होते. तो तुम्हाला तुमची भूमिका खुलून करण्यासाठी पूर्ण वाव देतो. मी माझ्या संवादांमध्ये काही ओळीही जास्तीच्या घेतल्या पण अनुरागने कट म्हटलं नाही.. त्यानंतर सगळ्या सेटवर एकच हशा पिकला होता. मला त्यामुळे हे कळलं की मला जे वाटतंय ते मी लोकांपर्यंत पोहचवू शकते आहे.”

या सिनेमात एक प्रसंग आहे.. त्यात मी सरीताशी (सयामी खेर) बोलत असते.. ती म्हणते ताई चार वाजता फोन करते. त्यानंतर तातडीने माझं वाक्य आहे.. अगं ए गॅस बंद कर.. पहिल्यांदा सीन शूट करत होतो तेव्हा अनुरागने मला सांगितलं की असं काही तरी वाक्य म्हण जे इथे अपेक्षित नाही. तो सीन संपल्यानंतर मी म्हटलं अगं ए गॅस बंद कर.. त्यानंतर सेटवर एकच हशाही पिकला. असाही अनुभव अमृताने सांगितला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 22, 2020 1:52 pm

Web Title: anurag told me im lady nawazuddin during choked says amruta subhash scj 81
टॅग : Anurag Kashyap
Next Stories
1 Video : ‘सुशांत माझ्या पोटी पुनर्जन्म घेणार’; राखी सावंत पुन्हा बरळली
2 पांड्याच्या पुश-अप्सवर बॉलिवूड अभिनेत्री फिदा; नताशाने केली ‘ही’ कमेंट
3 “माझ्याशी पंगा घेतलास तर..”; सोनू निगमचा भूषण कुमारला इशारा
Just Now!
X