लॉकडाउनमुळे घरात बसलेला अभिनेता अर्जुन कपूर सध्या टीव्हीवर जुने कार्यक्रम पाहून आपला वेळ घालवत आहे. त्याला डीडी नॅशनल वाहिनीवरील ‘ब्योमकेश बक्षी’ ही मालिका प्रचंड आवडली. ही मालिका पाहून आता त्याला देखील चित्रपटांमध्ये डिटेक्टिव्ह होण्याचे वेध लागले आहेत.

सर्वाधिक वाचकपसंती – “भाईजानमुळे माझं करिअर वाचलं”; अभिनेत्याने मानले सलमान खानचे आभार

अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत अर्जुन म्हणाला, “मी लहानपणी शेरलॉक होम्स, ब्योमकेश बक्षी, जिमी कूडो, हर्क्युल पायरो यांच्या कथा वाचायचो. या व्यक्तिरेखेंवर तयार करण्यात आलेले चित्रपट, मालिका खुप मोठ्या प्रमाणावर पाहायचो. या सर्व आठवणी लॉकडाउनच्या निमित्ताने पुन्हा एकदा जागृत झाल्या आहेत. खास करुन ‘ब्योमकेश बक्षी’ ही मालिका पाहून तर डिटेक्टिव्ह व्यक्तिरेखा साकारण्याची इच्छा माझ्यामध्ये निर्माण झाली आहे.”

सर्वाधिक वाचकपसंती – “कशाला मदत करणार? मृतदेह उचलायला?”: मोदींच्या त्या ट्विटवर दिग्दर्शकाचा संताप

लॉकडाउनच्या काळात देशवासीयांनी घरातच राहावे यासाठी डीडी वाहिनीवर अनेक जुने कार्यक्रम पुन्हा एकदा सुरु करण्यात आले आहेत. यामध्ये ‘ब्योमकेश बक्षी’ ही मालिका देखील आहे. ९०च्या दशकात ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली होती. अगदी शेरलॉक होम्सची आठवण करुन देणाऱ्या या देसी डिटेक्टिव्हने पुन्हा एकदा धुमाकूळ घातला आहे. या मालिकेत अभिनेता रजित कपुर यांनी मुख्य व्यक्तिरेखा साकारली होती.