रविवारी रात्री अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर एकत्र करीना कपूर खानच्या बाळाला पाहाण्यासाठी गेले होते. तेव्हा करीनाच्या अपार्टमेंट खाली फोटोग्राफर अर्जुन आणि मलायकाचे फोटो काढण्यासाठी उभे होते. दरम्यान अर्जुन एका फोटोग्राफरवर भडकला असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
अर्जुनचा फोटोग्राफरवर भडकतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये अर्जुन आणि मलायका करीना कपूरच्या अपार्टमेंट बाहेर दिसत आहेत. दरम्यान त्या दोघांचे फोटो काढण्यासाठी फोटोग्राफर अपार्टमेंटच्या गेटवर चढला होता. ते पाहून अर्जुनला राग अनावर होतो. तो त्या फोटोग्राफरवर भडकतो.
View this post on Instagram
‘तुम्ही बिल्डिंगच्या भिंतीवर असं चढू नका. हे फार चुकीचं आहे. मी तुम्हाला विनंती करतो’ असे अर्जुन सुरुवातीला फोटोग्राफरला बोलताना दिसत आहे. पण फोटोग्राफरने ऐकले नाही हे पाहून अर्जुन चिडतो. ‘मी विनंती करत आहे पण तुम्ही ऐकायला तयार नाही. अरे… लाल शर्टवाला… आता घाबरून का पळत आहेस’ असे अर्जुन चिडून बोलताना दिसत आहे. अर्जुनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून चर्चेचा विषय ठरत आहे.
अर्जुन आणि मलायका गेल्या काही दिवसांपासून एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. ते सतत एकत्र डिनर डेटवर जाताना, सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहेत. बऱ्याच वेळा त्यांचे एकत्र फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.