09 August 2020

News Flash

“हॉस्पिटलचं बिल भरून मी कंगाल झालोय”; आजारी अभिनेत्याने मागितली आर्थिक मदत

माझ्याकडे आता एक रुपया सुद्धा उरलेला नाही.

‘सुसराल सिमर का’ या टीव्ही मालिकेतून लोकप्रिय झालेले अभिनेता आशीष रॉय सध्या आजारी आहेत. त्यांना गोरेगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. परंतु त्यांची आर्थिक अवस्था सध्या फारच बिकट आहे. अगदी रुग्णालयाचे बिल भरण्यासाठी सुद्धा त्यांच्याकडे पैसे उरलेले नाहीत.

अवश्य पाहा – मनोरंजनसृष्टीने सोडला सुटकेचा निश्वास; मुख्यमंत्र्यांनी मागण्यांसंदर्भात केल्या सूचना

अशिष यांना उपचारासाठी ICUमध्ये ठेवण्यात आले होते. टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, “दोन दिवसांचं बिल जवळपास दोन लाख रुपये झाले आहे. ते पैसे मी भरले परंतु आता अधिक काळ मी रुग्णालयात उपचार घेउ शकणार नाही. कारण माझ्याकडे आता एक पैसाही उरलेला नाही. मी पार कंगाल झालो आहे. या स्थितीत मला मदतीची गरज आहे. मला आशा आहे की कुणीतरी मला नक्की मदत करेल.”

अवश्य पाहा – Video: फोनवर बोलण्यात गुंग असणाऱ्या गायकाच्या हातात गर्लफ्रेंडने ठेवला साप

आशीष रॉय यांनी काही दिवसांपुर्वी एक फेसबुक पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी मदतीचे आवाहन केले होते. त्यांची ही पोस्ट पाहून चित्रपट निर्माते, दिग्दर्शक हंसल मेहता हे मदतीसाठी पुढे आले होते. हंसल मेहता यांनी ‘इंडियन फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशन’चे (आयएफटीडीए) अध्यक्ष अशोक पंडित यांना टॅग करत आशिष रॉय यांची अडचण सांगितली. आणि मदत करण्याचे आश्वासन दिले.

आशीष रॉय यांनी ‘ससुराल सिमर का’, ‘बनेगी अपनी बात’, ‘ब्योमकेश बाक्क्षी’, ‘यस बॉस’, ‘बा बहू और बेबी’, ‘मेरे अंगने में’, ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’ आणि ‘आरंभ’ यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. तसंच ते व्हॉइस आर्टिस्टही आहेत. त्यांनी ‘सुपरमॅन रिटर्न्स, ‘द डार्क नाइट’, ‘गार्जियन्स ऑफ द गॅलेक्सी’, ‘द लेजेंड ऑफ टार्झन’ आणि ‘जोकर’ या हॉलिवूडपटांसाठी डबिंगही केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 21, 2020 12:48 pm

Web Title: ashiesh roy in terrible condition says i dont have a single penny mppg 94
Next Stories
1 ऑनस्क्रिन ‘भल्लालदेव’ची रिअल लाईफमधली ‘देवसेना’; पाहा साखरपुड्याचे फोटो
2 मराठी अभिनेत्रीचा पतीसोबत बोल्ड अवतार; फोटो होतोय व्हायरल
3 नोटाबंदीवर अनुराग कश्यपचा चित्रपट; अमृता सुभाष, उपेंद्र लिमये महत्त्वपूर्ण भूमिकेत
Just Now!
X