13 July 2020

News Flash

‘बिग बॉस’च्या घरात पुनीत इस्सरचा पुनर्प्रवेश!

नाटयपूर्ण घडामोडींसाठी चर्चेत असणाऱ्या 'बिग बॉस' या मालिकेने पुन्हा एकदा धक्कादायक वळण घेतले आहे. घरातून बाहेर गेलेला पुनित इस्सर परतल्यामुळे अनेक स्पर्धकांच्या काळजाचा ठोका

| November 6, 2014 05:36 am

नाटयपूर्ण घडामोडींसाठी चर्चेत असणाऱ्या ‘बिग बॉस’  या मालिकेने पुन्हा एकदा धक्कादायक वळण घेतले आहे. घरातून बाहेर गेलेला पुनित इस्सर परतल्यामुळे अनेक स्पर्धकांच्या काळजाचा ठोका चुकला. दुर्योधनाच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असणाऱ्या पुनित इस्सरने बिग बॉसमधील एका कार्यादरम्यान आर्य बब्बरविरुद्ध शारीरिक बळाचा वापर केला होता. या सगळ्या प्रकारानंतर पुनीतने घरातील सर्व सदस्यांसमोर आर्यची माफीदेखील मागितली होती. मात्र, बिग बॉसने या प्रकाराची गंभीर दखल घेत पुनितची रवानगी घराबाहेर केली होती. मात्र, अचानकपणे पुनीत इस्सर घरात परतला आहे. पुनीतला घरात परतण्याची संधी मिळाली असली तरी, बिग बॉसने पुनीतला त्याच्या चुकीची पुरेपूर शिक्षा देण्याचे ठरविले आहे. त्यासाठी त्याला घरामध्ये एका पिंजऱ्यात बंदिस्त करण्यात आले आहे. पुनित घरात परतल्याची माहिती मिळताच, त्याला बघण्यासाठी अनेक स्पर्धकांनी पिंजऱ्याच्या दिशेने धाव घेतली तेव्हा, तो चांगलाच नरमलेला दिसत होता. यावेळी पुनितने झालेल्या कृत्याबद्दल सर्व सदस्यांची माफी मागितली. या प्रकारानंतर बिग बॉसच्या घरातील वातावरण भावूक झालेले पहायला मिळत होते.
puneet-embed

या सगळ्यादरम्यान ‘शौकिन’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी लिसा हेडनचे घरात झालेले आगमन सगळ्यांसाठी आनंददायी क्षण ठरला. यावेळी सर्व स्पर्धकांनी लिसाशी गप्पा मारत वेळ मजेत घालवला. लिसा वाईल्ड कार्डद्वारे घरात आल्याचा समज झाल्यामुळे डायंड्रा काही काळासाठी आनंदीतही झाली होती. मात्र, तिचा आनंद फार काळ टिकू शकला नाही.   
lisa-embed

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 6, 2014 5:36 am

Web Title: bigg boss 8 and puneet issar is back
Next Stories
1 शौचालये आणि स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासाठी अमिताभ यांचा पुढाकार
2 ‘रंग रसिया’ चित्रपटावर केरळ न्यायालयाची बंदी
3 ‘हॅप्पी न्यू इयर’ सुमार दर्जाचा चित्रपट – जया बच्चन
Just Now!
X