27 February 2021

News Flash

‘त्या पार्टीत आमची भेट झाली अन्…’; अशी सुरू झाली रिया-सुशांतची लव्हस्टोरी

एका मुलाखतीत रियाने तिची लव्हस्टोरी सांगितली

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतचं निधन होऊन आता बराच काळ लोटला आहे. मात्र, अजूनही काही प्रश्न अनुत्तरीतच आहे. सुशांतने नेमकी आत्महत्या केली की त्याची हत्या झाली याचा तपास सुरु आहे. आज सुशांतचा जन्मदिवस त्यामुळे सेलिब्रिटींपासून ते चाहत्यांपर्यंत प्रत्येक जण आज त्याच्या आठवणींमध्ये भावूक होत आहे. यामध्येच सध्या सोशल मीडियावर रिया चक्रवर्ती आणि सुशांतची लव्हस्टोरी चर्चेत आली आहे.

सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी रिया चक्रवर्तीकड मुख्य संशियत आरोपी म्हणून पाहिलं जात आहे. अलिकडेच रिया चक्रवर्तीने ‘आजतक’ला दिलेल्या मुलाखतीत अनेक गोष्टींचा उलगडा केला आहे. यात तिने सुशांत आणि तिची लव्हस्टोरीदेखील सांगितल्याचं पाहायला मिळालं.

“मी आणि सुशांत… आमची खूप वर्षांची मैत्री होती. २०१३ मध्ये सुशांत आणि माझी पहिली भेट झाली. त्यावेळी माझा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि सुशांतचा ‘काई पो चे’ प्रदर्शित होणार होता किंवा कदाचित झाला होता. तेव्हा तो यशराज फिल्म्समध्ये येत होता. त्यावेळी तो न्यू टॅलेंट म्हणून ओळखला जात होता. आमच्या दोघांचा मॅनेजर एकच होता. यशराज फिल्म्सच्या जीममध्ये आमची एकमेकांशी ओळख झाली. त्यानंतर मग बरेचदा अवॉर्ड फंक्शन किंवा अन्य कार्यक्रमात आमच्या भेटी होत गेल्या. आमची त्यावेळी फार चांगली मैत्री झाली होती. वर्षांतून जरी एकदा भेटलो तरी आम्ही खूप गप्पा मारायचो”, असं रिया म्हणाली.

वाचा : कंगना रणौतच्या अडचणीत वाढ; ‘त्या’ प्रकरणी मुंबई पोलिसांकडून समन्स

पुढे ती म्हणते, “त्यावेळी मला सगळं छान वाटतं होतं. कायम वाटायचं हा मुलगा थोडा वेगळा आहे, याच्यासोबत बसून बऱ्याच गप्पा माराव्यात. त्यानंतर १३ एप्रिल २०१९ मध्ये रोहिणी अय्यर यांच्या पार्टीत आमची परत भेट झाली आणि तेथूनच आमचं अफेअर सुरु झालं. त्याने मला प्रपोज केलं होतं. पण मी मुद्दाम दोन-तीन महिन्यात सांगते असं म्हणाले”.

दरम्यान, रियाने तिची आणि सुशांतची लव्हस्टोरी सांगितल्यानंतर प्रेमाची अशी शिक्षा मिळेल असं कधीच वाटलं नव्हतं असंही म्हटलं. सुशांतने आत्महत्या केल्यानंतर अनेकांनी रियावर निशाणा साधला आहे. सुशांतच्या कुटुंबीयांनीदेखील तिच्यावर अनेक आरोप केले आहेत. मात्र या सगळ्यावर रियाने या मुलाखतीत मौन सोडल्याचं पाहायला मिळालं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 21, 2021 9:39 am

Web Title: birthday special sushant singh rajput rhea chakraborty lovestory ssj 93
Next Stories
1 कंगना रणौतच्या अडचणीत वाढ; ‘त्या’ प्रकरणी मुंबई पोलिसांकडून समन्स
2 “शुटिंग दरम्यान बोल्ड सीन देताना सेटवर प्रत्येक व्यक्ती…”, सनीने केला खुलासा
3 ‘तांडव’ विरोधात घाटकोपर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल
Just Now!
X