‘बाहुबली’ या सुपहिट चित्रपटाचे दिग्दर्शक एस.एस.राजामौली एक नवा चित्रपट घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. या आगामी चित्रपटाचं नाव ‘आर.आर.आर.’ असं आहे. अलिकडेच या चित्रपटाचा पहिला मोशन टीझर प्रदर्शित झाला. मात्र हा लक्षवेधी टिझर प्रदर्शित होताच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या टिझरमधील दृश्यांमधून हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप केला जात आहे. भाजपा नेता सोयम बापू आणि बंदी संजय कुमार यांनी दिग्दर्शकांना या व्हिडीओमध्ये बदल करण्याचा इशारा दिला आहे.

अवश्य पाहा – अभिनेत्रीनं शेअर केले न्यूड फोटो; कारण ऐकून तुम्हीही कराल कौतुक

RRR या चित्रपटात अभिनेता ज्युनियर एनटीआर क्रांतीकारक कोहराम भीम यांची भूमिका साकारत आहे. या पहिल्या टिझरमधून चित्रपटातील एनटीआरचा लूक प्रेक्षकांसमोर आला. मात्र या इन्ट्रो व्हिडीओमध्ये एनटीआरच्या डोक्यावर एक टोपी दाखवण्यात आली आहे. या टोपीमुळे एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

अवश्य पाहा – हे १० चित्रपट कधीही लहान मुलांसोबत पाहू नका; कारण…

अवश्य पाहा – १४ वर्षांची असताना माझ्यावर लैंगिक अत्याचार झाले; आमिर खानच्या मुलीचा गौप्यस्फोट

क्रांतीकारक कोहराम भीम एक हिंदू होते मग त्यांच्या डोक्यावर मुस्लिम धर्मीय घालतात तशी टोपी का दाखवण्यात आली? असा सवाल भाजपा नेत्यांनी उपस्थित केला आहे. शिवाय चित्रपटाच्या माध्यमातून हिंदूंच्या भावना दुखावणं थांबवा व या दृश्यामध्ये बदल करा अन्यथा या चित्रपटाला थिएटरमध्ये प्रदर्शित होऊ देणार नाही असा धमकीवजा इशारा त्यांनी दिला आहे. आपल्या अनोख्या नावामुळे चर्चेत असलेल्या ‘आर.आर.आर.’ मध्ये एन टी रामा राव, राम चरण आणि अजय देवगण देखील झळकणार आहेत.