23 September 2020

News Flash

#couplegoals : लग्नानंतर मिलिंद-अंकिताचं पहिलं फोटोशूट

'आयर्न मॅन' मिलिंद सोमण पुन्हा एकदा सोशल मीडियावर सर्वांचच लक्ष वेधत आहे. यावेळी मिलिंद चर्चेत आहे ते म्हणजे पत्नी अंकिता सोबतच्या नव्या फोटोंमुळे

मिलिंद सोमण, अंकिता कोनवार, milind soman, ankita konwar

‘आयर्न मॅन’ मिलिंद सोमण पुन्हा एकदा सोशल मीडियावर सर्वांचच लक्ष वेधत आहे. यावेळी मिलिंद चर्चेत आहे ते म्हणजे पत्नी अंकिता सोबतच्या नव्या फोटोंमुळे. अंकिता आणि मिलिंदचे फोटो नेहमीच चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरतात. त्यातच आता आणखी काही फोटोंची भर पडली आहे. खुद्द मिलिंद आणि अंकिता यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन हे फोटो पोस्ट केले असून यात त्यांची केमिस्ट्री पाहण्याजोगी आहे.

एका ब्रॅण्डसाठी त्यांनी हे फोटोशूट केलं असून, ‘मेट्स फॉर लाइफ’ अशी या फोटोशूटसाठीची थीम होती. याच थीमला साजेशा पोशाखात मिलिंद आणि अंकिताने हे फोटोशूट केलं. फिटनेसकडे जास्तीत जास्त लक्ष देणाऱ्या या सेलिब्रिटी जोडीच्या केमिस्ट्रीने सध्या अनेकांचीच मनं जिंकली आहेत. फ्लोरल प्रिंट असणाऱ्या कापड्याच्या डिझायनर पोषाखात ते दोघंही एकमेकांना शोभून दिसत आहेत. तर दुसऱ्या एका लूकमध्ये त्यांच्या चेहऱ्यावर असणारे भाव पाहण्याजोगे आहेत.
२२ एप्रिल २०१८ ला हे दोघंही विवाहबंधनात अडकले होते. ज्यानंतरचं हे त्यांचं पहिलं फोटोशूट आहे, असं म्हणायला हरकत नाही. सध्या या फोटोशूटमधील काही फोटोच पोस्ट करण्यात आले आहेत. ज्यामुळे एका अर्थी उर्वरित फोटो पाहण्यासाठीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

वाचा : ‘लस्ट स्टोरीज’ : तिच्या ‘लालसे’ची चाकोरीबाहेरची चिकित्सा

दरम्यान, प्रेमाला वयाची मर्यादा नसते, अशा मतावर ठाम असणाऱ्या मिलिंदने २००६ मध्ये फ्रेंच अभिनेत्री Mylene Jampanoi सोबत लग्न केले होते. मात्र, त्यांचं हे नातं फार काळ टिकलं नाही. तीन वर्षाच्या संसारानंतर त्या दोघांनीही विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2018 3:29 pm

Web Title: bollywood actor model milind soman and ankita konwars first photo shoot after marriage
Next Stories
1 Video : असा साकारला ‘मुन्ना भाई’चा लूक
2 साराच्या करिअरमध्ये करिना करतेय अशी मदत
3 Video: वयाने मोठ्या महिलेला का डेट करतोय निक; त्यानेच केला खुलासा
Just Now!
X