अभिनेता सुशांत सिंग राजपूत व श्रद्धा कपूर यांची मुख्य भूमिका असलेला ‘छिछोरे’ हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. हा चित्रपट आयआयटीचे विद्यार्थी, त्यांच्यातील मैत्री आणि वसतिगृहातील राहणे यावर आधारलेला आहे. त्यामुळे कमी कालावधीमध्ये तरुणाईच्या पसंतीत उतरलेला हा चित्रपट लवकरच १०० कोटींचा टप्पा गाठणार आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.

‘छिछोरे’ या चित्रपटाने पहिल्या दिवशी २९.७८ कोटींचा गल्ला जमवला होता. त्यानंतर या कमाईची आकड्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत गेली. विशेष म्हणजे या चित्रपटाने आतापर्यंत ९८.०८ कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यामुळे हा चित्रपट लवकरच १०० कोटींच्या घरात प्रवेश करणार आहे. इतकंच नाही तर  तमिल रॉकर्स या वेबसाईटने या चित्रपटाची पायरेटेड कॉपी इंटरनेवर लीक केली आहे. तरीदेखील ‘छिछोरे’ला प्रेक्षकांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.

दरम्यान, या चित्रपटाचं दिग्दर्शन ‘दंगल’चे दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी केलं असून देशभरातील ४ हजार स्क्रीन्सवर हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे.