02 March 2021

News Flash

निर्मिती क्षेत्रानंतर आता फूड शोमध्ये चित्रांगदा सिंहचं पाऊल

'सूरमा' या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेत्री चित्रांगदा सिंह चित्रपट निर्मिती क्षेत्रात उतरली.

चित्रांगदा सिंह

‘सूरमा’ या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेत्री चित्रांगदा सिंह चित्रपट निर्मिती क्षेत्रात उतरली आहे. निर्मिती क्षेत्रात आपलं नशीब आजमावण्याचा प्रयत्न केल्यानंतर अभिनेत्री चित्रांगदा सिंह आता एका फूड शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एएक्सएन (AXN) या वाहिनीवर ऑक्टोबरपासून हा शो प्रसारित होणार आहे.

मेरिएट इंटरनॅशनल ही जगातील सर्वात मोठी आदरातिथ्‍य शृंखला आणि एएक्‍सएन इंडिया (AXN India) या शोसाठी एकत्र आले आहेत. या सहयोगाच्या माध्यमातून या पाककला कार्यक्रमाची निर्मिती करण्यात येणार आहे.

वाचा : आलिया व माधुरी दीक्षित यांच्यात ‘कलंक’मध्ये रंगणार जुगलबंदी

चित्रांगदाने आहारविषयातली संपादन केलेली पदवी, अभिनेत्री म्हणून तिच्या व्यक्तिमत्त्वाचा विचार करत तिला या शोसाठी निवडण्यात आलं. याविषयी चित्रांगदा म्हणाली, ‘आपल्या जीवनात अन्नाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मेरिएटचे शेफ अगदी आगळ्यावेगळ्या चवीचे पदार्थ बनवतात. मला नेहमीच पाककला, आपली संस्‍कृती आणि जगभरात प्रवास करण्‍याबाबत रुची राहिली आहे. याच आवडीने मला विविध पदार्थांचा स्‍वाद घेण्‍याची संधी दिली आहे.’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 9, 2018 5:54 pm

Web Title: chitrangda singh to be seen in an all new food show
Next Stories
1 आलिया व माधुरी दीक्षित यांच्यात ‘कलंक’मध्ये रंगणार जुगलबंदी
2 ‘तारक मेहता..’मध्ये लवकरच परतणार दयाबेन
3 इरफान खानसोबतच्या चित्रपटातून दीपिकाने घेतला काढता पाय?
Just Now!
X