27 February 2021

News Flash

इरफान खानसोबतच्या चित्रपटातून दीपिकाने घेतला काढता पाय?

चित्रपट स्विकारताना घेतलेली रक्कमसुद्धा तिने निर्माते विशाल भारद्वाज यांना परत केल्याचं समजतंय.

इरफान खान, दीपिका पदुकोण

दीपिका पदुकोण आणि इरफान खान यांचा ‘पिकू’ हा चित्रपट आजही अनेकांच्या फेव्हरेट लिस्टपैकी एक असेल. या चित्रपटातील या दोघांची अनोखी केमिस्ट्रीच खूप काही सांगून गेली. ही ‘पिकू’ची जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना पाहायला मिळणार होती. पण इरफान खानसोबतच्या आगामी चित्रपटातून दीपिका पदुकोणने माघार घेतल्याचं कळतंय.

‘डीएनए’नं दिलेल्या वृत्तानुसार ‘सपना दीदी’ या चित्रपटातून दीपिकाने काढता पाय घेतला. चित्रपट स्विकारताना घेतलेली रक्कमसुद्धा तिने निर्माते विशाल भारद्वाज यांना परत केल्याचं समजतंय. इरफान खान सध्या कर्करोगावरील उपचारासाठी लंडनमध्ये आहे. त्याच्या तब्येतीत सुधारणा होत असली तरी तो नेमकं कधीपर्यंत परतणार हे अद्याप स्पष्ट नाही. त्यातच नोव्हेंबरमध्ये दीपिका अभिनेता रणवीर सिंगशी लग्नगाठ बांधणार आहे. त्यामुळे या चित्रपटाचं भविष्य अधांतरी असल्याने दीपिकाने हा निर्णय घेतल्याचं समजतंय.

वाचा : सुरुवातीच्या काळात बॉलिवूडमध्ये मला हीन वागणूक मिळाली- अक्षय कुमार 

हनी तेहरान दिग्दर्शित या सिनेमाची निर्मिती विशाल भारद्वाज आणि क्रिअर्ज एण्टरटेनमेन्ट मिळून करणार आहेत. दीपिका या चित्रपटात एका राहिमा खान उर्फ सपना दीदी या लेडी डॉनच्या भूमिकेत दिसणार होती. आता इरफान खान परतल्यानंतर दीपिका पुन्हा या चित्रपटासाठी होकार देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 9, 2018 12:55 pm

Web Title: deepika padukone returns signing amount of film sapna didi to vishal bhardwaj
Next Stories
1 ‘सुरुवातीच्या काळात बॉलिवूडमध्ये मला हीन वागणूक मिळाली’
2 सोनाली बेंद्रेच्या मृत्यूच्या अफवांवर तिचा पती म्हणाला…
3 ‘बॉईज २’मधील धमाल गाणे प्रदर्शित
Just Now!
X