27 February 2021

News Flash

होकार देण्यापूर्वी दीपिकानं रणवीरसमोर ठेवली होती ही सर्वात मोठी अट

'२०१२ साली ब्रेकअप झाल्यानंतर मला सर्वाधिक त्रास झाला होता. '

दीपिका आणि रणवीर ही बॉलिवूडमधली सर्वात लोकप्रिय जोडी आहे. ते जणू एकमेकांसाठी बनले आहे असं अनेक चाहते या जोडीकडे पाहून म्हणतात. दृष्ट लागण्याजोग्या या जोडीनं गेल्याच महिन्यात साता जन्माची गाठ बांधली. सहा वर्षांच्या रिलेशनशिपनंतर १४ नोव्हेंबरला ही जोडी कुटुंबीयांच्या साक्षीनं विवाहबंधनात अडकली. गेले कित्येक वर्षे आपल्या प्रेमप्रकरणाबद्दल बऱ्याच गोष्टी लपवून ठेवलेल्या या जोडीनं आता चाहत्यांपुढे एकन् एक गुपित उघड करायचं ठरवलं आहे.

नुकत्याच ‘फिल्मफेअर’ मासिकाला दिलेल्या एका मुलाखतीत दीपिकानं रणवीरसमोर ठेवलेल्या अटीबद्दल सांगितलं. रणवीरला होकार देण्यापूर्वी हे नातं ‘ओपन रिलेशनशिप’प्रमाणे असावं अशी तिची इच्छा होती, यामागची तिची भूमिका तिनं या मुलाखतीत स्पष्ट केली. ‘रणीबीर कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतरचा काळ माझ्यासाठी खूपच कठीण होता. यापूर्वी अनेकांनी माझा विश्वासघात केला होता. ही चूक पुन्हा मला करायची नव्हती. कोणालाही सतत स्पष्टीकरण देण्याच्या मानसिकतेत मी नव्हती. म्हणूनच मला ओपन रिलेशनशिप हवं होतं. जिथे कोणतंचं बंधन मला नको होतं. जर मला दुसरी एखादी व्यक्ती आवडू लागली तर मी तिचा विचार करेल असं मी त्याला सांगितलं होतं. पण सुदैवानं रणवीरसोबत माझं चांगलं जुळलं.

रणवीरनं माझं मन जिंकलं आणि त्याच्यासोबतच्या नात्याला मी माझे १०० % देण्याचं ठरवलं, असं दीपिका या मुलाखतीत म्हणाली. तसेच या दोघांनी ४ वर्षांपूर्वीच साखरपुडा केला असल्याचं गुपितही तिनं याच मुलाखतीत उघड केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 30, 2018 1:11 pm

Web Title: deepika padukone wanted an open relationhsip with ranveer singh
Next Stories
1 Simmba Box Office Collection : ‘सिम्बा’ची परदेशातही छप्पर फाड के कमाई !
2 भन्साळींसाठी करण- अर्जुन एकत्र येणार?
3 नाटकांची कॉर्पोरेट नांदी
Just Now!
X