News Flash

दीपिका पदुकोण ठरली इंस्टाग्रामची ‘मस्तानी’

प्रियंका चोप्रालाही टाकले मागे

आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने लाखो प्रेक्षकांना भुरळ घालणारी दीपिका पदुकोण ही अभिनेत्री आता इंस्ट्राग्राम या सोशल नेटवर्किंग साइटची राणी ठरली आहे. सर्वाधिक फॉलो करण्यात येणाऱ्या अकाऊंटचे अवॉर्ड दीपिका पदुकोणने मिळवले आहे. ‘Most Followed Account’ हा पुरस्कार दीपिकाला जाहीर झाला आहे. तर क्रिकेटर विराट कोहलीला मोस्ट एंगेज्ड अकाऊंट या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. इंस्टाग्रामने पहिल्यांदाच अशा प्रकारच्या बक्षीसांची भारतात घोषणा केली आहे.

विराट कोहलीचे फॉलोअर्स १ कोटी ९० लाखांच्या घरात आहेत. सर्वाधिक एंगेज्ड अकाऊंटचा पुरस्कार त्याच्या अकाऊंटला जाहीर झाला आहे. २०१७ या वर्षात लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊसच त्याच्या अकाऊंटवर पडला आहे. तर अभिनेत्री प्रियंका चोप्राला मागे सारत दीपिका पदुकोण ही इंस्टाग्रामची क्वीन ठरली आहे. २ कोटी २० लाखांच्या वर फॉलोअर्स मिळवले आहेत. प्रियंका चोप्राचे फॉलोअर्स २ कोटींच्या घरात आहेत. तर आलिया भट ही अभिनेत्री इंस्टावरच्या टॉप थ्री अभिनेत्रींमध्ये तिसरी आहे. कारण जवपास १ कोटी ९० लाखांच्या घरात तिचे फॉलोअर्स आहेत.

माझ्या चाहत्यांसोबत मी इंस्टाग्रामच्या माध्यमातून जोडली जाते आहे यासारखी आनंदाची बाब माझ्यासाठी दुसरी नाही अशी प्रतिक्रिया दीपिका पदुकोणने दिली आहे. तसेच माझ्या चाहत्यांनी माझ्या इंस्टा अकाऊंटला दिलेल्या प्रतिसादाबाबत मी त्यांची आभारी आहे असेही दीपिकाने म्हटले आहे. ‘हिंदुस्थान टाइम्स’ने या संदर्भाले वृत्त दिले आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2018 10:47 pm

Web Title: deepika wins most followed account at instagram india awards
Next Stories
1 TOP 10 NEWS : बिग बींच्या माफीपासून अँजेलिना जोलीच्या लग्नापर्यंत, सर्वकाही एका क्लिकवर
2 कोंडाजी फर्जंद यांच्या धाडसाची गाथा सांगणाऱ्या ‘फर्जंद’चा टीझर प्रदर्शित
3 सईचा लक्षवेधी रॅम्पवॉक
Just Now!
X