News Flash

‘तो’ करायचा दिया मिर्झाचा पाठलाग; एके दिवशी त्याने…

त्या व्यक्तीने तिचा घरापर्यंत पाठलाग केला.

बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा गेल्या काही काळात आपल्या चित्रपटांपेक्षा सोशल मीडियावरील फोटो आणि वृत्तमाध्यमांना दिलेल्या मुलाखतींमुळे जास्त चर्चेत असते. दियाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या लहानपणीचा एका आवाक् करणारा किस्सा सांगितला आहे. ती लहान असताना एक व्यक्ती तिचा दररोज पाठलाग करायचा आणि एके दिवशी तर त्याने तिला भर रस्त्यात अडवून असे काहीतरी केले की ज्यामुळे ती पुढील काही आठवडे घरातून बाहेर देखील पडत नव्हती.

अवश्य वाचा – या ७ कारणांमुळं भारतानं न्यूझीलंडवर मिळवला विजय

काय म्हणाली दिया?

लहान असताना दिया हैद्राबादमध्ये राहात होती. हा किस्सा ती शाळेत असतानाचा आहे. दुपारी शाळेतून घरी येताना एक अज्ञात व्यक्ती दररोज तिचा पाठलाग करायचा. सुरुवातीला दियाने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. परंतु असा प्रकार जवळपास तीन आठवडे सुरु होता. तिने ही गोष्ट आपल्या घरी सांगितली नव्हती. एके दिवशी त्याने भर रस्त्यात तिला अडवून हात पकडला. परंतु दियाने त्याला एक जोरदार लाथ मारली व ती

अवश्य वाचा – ‘तेजस’मध्ये कंगना; होणार एअर फोर्स पायलट

आपल्या घराच्या दिशेने पळत सुटली. त्या व्यक्तीने तिचा घरापर्यंत पाठलाग केला. परंतु दियाला तो पकडू शकला नाही. या प्रसंगामुळे दिया प्रचंड घाबरली होती. जवळपास तीन आठवडे ती घरातून बाहेर देखील निघत नव्हती. परंतु एके दिवशी आईने दिलेल्या प्रोत्साहनाच्या जोरावर तिने अशा प्रसंगांचा धाडसाने सामना करण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून दिया अशा प्रकारच्या प्रसंगांना धैर्याने तोंड देऊ लागली. हा किस्सा तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2020 7:51 pm

Web Title: dia mirza faced a stalker when she was younger mppg 94
Next Stories
1 VIDEO : इंग्रजी येत नसल्यानं संकर्षणसोबत घडला होता ‘हा’ किस्सा
2 ‘तेजस’मध्ये कंगना; होणार एअर फोर्स पायलट
3 शाहरुखचा ‘मन्नत’ हा बंगला विकत घ्यायचा होता सलमानला, पण..
Just Now!
X