News Flash

भारतात ‘या’ गाण्याची क्रेझ अजूनही; तब्बल ५० कोटी व्ह्यूजचा टप्पा पार

या गाण्याच्या लोकप्रियतेनं सर्वांनाच थक्क केलं आहे.

'शेप ऑफ यू'च्या लोकप्रियतेनं सर्वांनाच थक्क केलं आहे.

‘शेप ऑफ यू’ हे गाणं म्हटलं की ब्रिटीश गायक एड शीरन याचा चेहरा डोळ्यांसमोर येतो. जगभरात या गाण्याने मिळवलेल्या प्रसिद्धीची तुलना इतर कोणत्याच गाण्याशी होऊ शकत नाही. आंतरराष्ट्रीय संगीत विश्वातील प्रसिद्ध गायक एड शीरनचं हे सुपरहिट गाणं भारतात व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर तब्बल ५० कोटी वेळा पाहिलं आहे. हॉलिवूडपासून बॉलिवूडपर्यंत या गाण्याने सर्वांनाच वेड लावलं आहे. सोशल मीडियावर आणि तरुणाईमध्ये त्याच्या या गाण्याची प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे.

‘शेप ऑफ यू’च्या लोकप्रियतेनं सर्वांनाच थक्क केलं असून अनेकांनी तर या गाण्याचे रिक्रिएटेड व्हर्जन्सही शेअर केले आहेत. ‘सावन’, ‘गाना’, ‘हंगामा’ आणि ‘विंक’ यांसारखे ऑडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म या गाण्याची लोकप्रियता पाहून आश्चर्यचकीत झाले आहेत. इतर कोणत्याच गाण्याला एवढी लोकप्रियता मिळाली नव्हती.

वाचा : सुपरस्टार बहीणसुद्धा ‘तिचं’ नशिब बदलू शकली नाही

‘सोनी म्युझिक इंडिया’चे आंतरराष्ट्रीय संगीत प्रमुख अर्जुन शंकालिया यांनी याबाबत म्हटलं की, ‘भारतातील लोकांमध्ये एक नवीन पॅटर्न पाहायला मिळतोय. जे हिंदी आणि प्रादेशिक गाण्यांशिवाय इंग्रजी गाण्यांना ऐकणं अधिक पसंत करत आहेत. एड शीरनसारख्या कलाकारांनी भौगोलिक सीमा ओलांडल्या आहेत. कारण इंदौर, भिलाई, पटियाला आणि कोच्ची यांसारख्या भागांतही हे गाणं मोठ्या प्रमाणावर ऐकलं जात आहे. तसंच त्या भागात एड शीरनच्या चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2017 1:53 pm

Web Title: ed sheeran shape of you crosses half a billion streams in india
Next Stories
1 सुपरस्टार बहीणसुद्धा ‘तिचं’ नशिब बदलू शकली नाही
2 ‘सायको’च्या निर्मितीमागील रहस्य
3 एक्स मेनला ‘ब्लू व्हेल’चे आव्हान
Just Now!
X