News Flash

Oscar 2020 : पिकनिकसाठी ‘या’ अभिनेत्याने दिला होता ‘ऑस्कर’ला नकार

'हा' होता ऑस्कर पटकावणारा जगातील पहिला अभिनेता

‘ऑस्कर’ हा सिनेसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठीत पुरस्कार मानला जातो. हा पुरस्कार पटकावणं हे जगातील जवळपास प्रत्येक सिनेकलाकाराचं स्वप्न असत. अर्थात प्रत्येक कलाकाराचं हे स्वप्न पूर्ण होतंच असं नाही. मग आशा वेळी तो कलाकार किमान ऑस्कर पुरस्काराला हजेरी तरी लावता यावी हे दुय्यम स्वप्न तो पाहू लागतो. याच्या जोडीला मग रेड कारपेटवर मिरवणे आणि नामवंत वृत्तमाध्यमांच्या फोटोग्राफर्स समोर ऐटित पोझ देणे ही स्वप्ने देखील तो रंगवू लागतो. परंतु जगाच्या पाठीवर ‘मार्लिन ब्रॅन्डो’, ‘रोमन पोलन्स्की’, ‘मायकल केन’, ‘एलिझाबेथ टेलर’ यांसारखेही काही कलाकार आहेत. ज्यांनी ऑस्कर सोहळ्याला किमान हजेरी लावावी यासाठी त्यांना वारंवार विनंती केली गेली.

एमिल जॅनिंग्स हे या यादीतलं पहिलं नाव. जगातील पहिला सुपरस्टार म्हणून ओळखला जाणारा एमिल अत्यंत विचित्र कलाकार होता. या पठ्ठ्यानं पिकनीकला जाता यावं म्हणून थेट ऑस्कर घेण्यास नकार दिला होता.

काय होता तो प्रसंग?

१६ मे १९२९ हे ऑस्करचं पहिलं वर्ष होतं. त्यावेळी पहिल्यांदाच चित्रपट सृष्टीतील कलाकारांचं पुरस्कार देऊन कौतुक केलं जाणार होतं.

१९२७ साली प्रदर्शित झालेला ‘द वे ऑफ ऑल प्लेश’ आणि १९२८ साली प्रदर्शित झालेला ‘द लास्ट कमांड’ हे दोन चित्रपट त्यावेळी तुफान चर्चेत होते. या दोन्ही चित्रपटात अभिनेता एमिल जॅनिंग्स याने प्रमुख भूमिका साकारली होती. संपूर्ण जग दुसऱ्या महायुद्धाच्या दिशेने मार्गक्रमण करत असतानाही एमिलच्या अभिनयाचं कौतुक युरोप-अमेरिका खंडात केलं जात होतं. त्यामुळे सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पहिला ऑस्कर पुरस्कार एमिल जॅनिंग्सला देण्याचं ठरलं.

तीन महिने आधीच वृत्तपत्रांमधून त्याच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. परंतु एमिलने काहीतरी वेगळंच नियोजन केलं होतं. ऐनवेळी त्याने ऑस्कर समितीला टांग दिली. त्याने पुरस्काराला येण्यास नकार दिला. कारण त्याला आपल्या प्रेयसीबरोबर युरोपच्या दौऱ्यावर जायचं होतं.

त्यावेळच्या काही अमेरिकन वृत्तमाध्यमांच्या मते एमिल आणि ऑस्कर समितीतील काही सभासदांमध्ये ३६ आकडा होता. त्यांना अद्दल घडवण्यासाठी त्याने युरोप दौऱ्याचं नाटकं केलं होतं. अर्थात त्याच्या नकारामागील कारण काहीही असंल तरी त्यामुळे ऑस्कर समितीतील सभासदांचा अपमान झाला हे मात्र खरं. कारण तीन महिने आधी माहिती देऊनही त्याने नकार दिला होता. परंतु सभासदांनी अपमान तसाच गिळला आणि तीन दिवस आधी त्याच्या घरी जाऊन त्याला पुरस्कार प्रदान केला. यामागे ऑस्कर पुरस्कारांची प्रेक्षकांनी गांभिर्याने नोंद घ्यावी ही एकमेव इच्छा होती, असं म्हटलं जातं. मात्र त्यानंतर एमिल जॅनिंग्स यांना एकदाही ऑस्करचं साधं नामांकनही मिळालं नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2020 4:12 am

Web Title: emil jannings the first ever best actor winner at the oscars mppg 94
Next Stories
1 Oscar 2020: ‘ऑस्कर’ विजेत्यांची निवड करतं कोण?
2 Oscar 2020 : ‘ऑस्कर’ विजेत्यांची नावं ठेवतात गोपनीय, कारण…
3 Oscar 2020 : ‘या’ भारतीय महिलेनं पटकावला होता पहिला ‘ऑस्कर’
Just Now!
X