News Flash

इम्रान हाश्मीच्या मुलाची कर्करोगावर यशस्वीरित्या मात

आयानला २०१४ साली मूत्रपिंडाचा कर्करोग असल्याचं निष्पन्न झालं होतं.

इम्रान हाश्मी

बॉलीवूड अभिनेता इम्रान हाश्मी याच्या पाच वर्षाच्या मुलाने कर्करोगावर यशस्वीरित्या मात केली आहे. आयानला २०१४ साली मूत्रपिंडाचा कर्करोग असल्याचं निष्पन्न झालं होतं. त्यानंतर त्याच्यावर उपचार सुरु होते. या उपचाराअंती अयानचा कर्करोग बरा झाला आहे. अशी माहिती इम्रान सोशल मीडियावर दिली आहे.

इम्रानने ट्विटरवर अयानसोबतचा एक फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे. ‘पाच वर्षानंतर अखेर अयान कर्करोगातून मुक्त झाला आहे. या आजारावर त्याने यशस्वीरित्या मात केली आहे. हे पाच वर्ष म्हणजे आमच्यासाठी फार मोठा आणि अवघड असा काळ होता. मात्र तुमच्या आशीर्वादामुळे आणि प्रेमामुळेच अयान यातून सुखरूपपणे बाहेर पडला आहे’, असं इम्रानने शेअर केलेल्या फोटोला कॅप्शन दिलं आहे.

पुढे तो असंही म्हणतो, ‘कर्करोगासारख्या अजाराशी सामना करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला प्रेम, आशीर्वाद, आधार आणि विश्वास या गोष्टींची गरज असते. त्यामुळे या काळात आपण त्यांच्यासोबत असणं गरजेचं असतं’.

दरम्यान, अभिनेता इम्रान हाश्मीने अयानच्या या आजारपणाच्या काळात ‘द किस ऑफ लाईफ: हाऊ अ सुपरहिरो अँड माय सन डिफिटेड कॅन्सर’ हे पुस्तक लिहीलं. या पुस्तकात इमरानने अयानच्या कॅन्सरवरील उपचारादरम्यानचे अनुभव आणि प्रसंग कथन केले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2019 5:47 pm

Web Title: emraan hashmi son ayaan has been declared cancer free
Next Stories
1 Pardhad Trailer: पारधी समाजातील जळजळीत सत्य समोर आणणारा पारधाड
2 बॉक्स ऑफिसवर विकी कौशलचा ‘उरी’ सुसाट!
3 Photo : फरहान अख्तरचा गर्लफ्रेंडसह स्विमिंग पुलमधला फोटो व्हायरल
Just Now!
X