News Flash

‘या’ दिवशी करीना सांगणार तैमूरच्या धाकट्या भावाचं नाव?

जाणून घ्या सविस्तर

बॉलिवूडची बेबो करीना कपूर खान दुसऱ्यांदा आई झाली. तिच्या मुलाला पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. मात्र, करीनाने तिच्या बाळाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केलेला नाही. सोबतच तिच्या धाकट्या मुलाचे नाव काय आहे हे देखील तिने सांगितले नाही. या सगळ्यामुळे तिच्या चाहत्यांची उत्सुकता ही शिगेला पोहोचली आहे.

करीना आणि सैफच्या चाहत्यांना वाटतं की त्यांच्या धाकट्या मुलाचं नाव आधीच ठेवलं असून त्यांना ते कोणाला सांगायचे नाही. तैमूरवर ज्या प्रमाणे सोशल मीडियावर चर्चा होत असतात. तशा चर्चांपासून त्यांना त्यांच्या दुसऱ्या बाळाला लांब ठेवायचं आहे. अनेक कलाकारांनी त्यांच्या मुलांच्या तिसऱ्या वाढदिवसाला त्यांच्या मुलांचा फोटो आणि त्यांच नाव सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना सांगितल. त्याप्रमाणे करीना देखील तिच्या मुलाच नाव लवकरच सांगेल आणि सोबतच त्याचा फोटोदेखील शेअर करेल अशी आशा तिच्या चाहत्यांना लागली आहे. तिचे चाहते २१ एप्रिलच्या प्रतिक्षेत आहे कारण त्या दिवशी तिचा दुसरा मुलगा आणि तैमूरचा धाकटा भाऊ हा ३ महिन्यांचा होणार आहे.

करीनाने चित्रीकरणाला सुरूवात केली आहे. तिने तिच्या बाळाविषयी अजूनही कोणत्याही प्रकारची माहिती दिलेली नाही. करीनाला सगळ्या गोष्टी ग्रँड करायला आवडतात. तर करीना तिच्या बाळाचं नाव आणि तीन महिन्याचं तिचं बाळ झाल्याचा उत्सव लंडनमध्ये जाऊन करणार आहे का? असा प्रश्न तिच्या चाहत्यांसमोर आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून करीनाला लंडनची प्रचंड आठवण येतं आहे असे तिने अनेक वेळा सांगितलं आहे. काही चाहत्यांना वाटते की करीना आणि सैफ करोनाच्या भीतीमुळे त्यांच्या बाळाला बाहेर घेऊन जातं नाही. मात्र, काहीही असलं तरी सैफीनाच्या चाहत्यांनी आशा सोडली नाही आहे. त्यांना लवकरच तैमूरच्या धाकट्या भावाच नाव समजेल असे ते म्हणतं आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 31, 2021 11:55 am

Web Title: is this when kareena kapoor khan will reveal the name of her second baby dcp 98
Next Stories
1 गर्भपातामुळे पत्नी घेत होती गोळ्या; अटकेनंतर एजाज खानचा खुलासा
2 माधुरीच्या ‘डान्स दीवाने’ सेटवर करोनाचा उद्रेक, १८ जण पॉझिटीव्ह
3 या अभिनेत्रीच्या प्रेमात होता गोविंदा, करायचं होतं लग्न पण…
Just Now!
X