06 March 2021

News Flash

सल्लू हे नाव कसं पडलं?; सलमानने सांगितला अजब नावामागील गजब किस्सा

या अभिनेत्याने सलमानचं नाव सल्लू ठेवलं

सलमान खान बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. काही जण त्याला बॉलिवूडचा ‘भाईजान’ म्हणतात, तर काही जण ‘सल्लू’. पण तुम्हाला माहिती आहे का सलमानचं सल्लू हे नाव कोणी ठेवलं? नाही? तर मग हा व्हिडीओ पाहा. या व्हिडीओमध्ये स्वत: सलमानने आपल्या सल्लू या नावाचा गंमतीशीर किस्सा सांगितला आहे.

अवश्य पाहा – “तुम्हीही सोडून गेलात?”; जगदीप यांच्या निधनामुळे ‘शोले’मधील अभिनेत्याला मानसिक धक्का

 

View this post on Instagram

 

There’s no one like Bidu

A post shared by Filmygyan Videos (@filmygyanvideos) on

अवश्य पाहा – उज्जैन पोलिसांकडून विकास दुबेला अटक; नेटकऱ्यांनी Memes मधून घेतली UP पोलिसांची फिरकी

सलमानला अभिनेता जॅकी श्रॉफ याने पहिल्यांदा सल्लू म्हणून हाक मारली होती. जॅकी आणि सलमान खूप चांगले मित्र आहेत. सुरुवातील जॅकी सलमानला प्रेमाने सल्लू म्हणून हाक मारायचा. ही हाक आसपासचे अनेक लोक ऐकायचे अन् ते देखील तशीच हाक मारायचे. आता तर हा शब्द इतका प्रसिद्ध झाला आहे की चाहते देखील त्याला प्रेमाने सल्लू म्हणूनच हाक मारतात. जॅकी श्रॉफ काही वेळेस त्याला सल्ले म्हणून देखील हाक मारायचा.

सलमान खानचा हा गंमतीशीर व्हिडीओ फिल्मीज्ञान या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक जण सल्लू नावाचा हा किस्सा ऐकून चकित झाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 9, 2020 7:34 pm

Web Title: jackie shroff gave the name sallu to salman khan mppg 94
Next Stories
1 नीतू कपूर यांच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये दिसला करण जोहर, झाला पुन्हा ट्रोल
2 जर मी अभिनेता बनलो नसतो तर नक्कीच कुकिंगमध्ये करिअर केले असते- धीरज धूपार
3 “मी भारतीय असल्यामुळे…”; अभिनेत्रीने सांगितला परदेशातील ‘तो’ धक्कादायक अनुभव
Just Now!
X