बॉलिवूड चित्रपट निर्माते बोनी कपूर यांच्या घरात काम करणाऱ्या एका व्यक्तीला करोनाची लागण झाली होती. परिणामी बोनी कपूरसह दोन्ही मुली जान्हवी कपूर आणि खूशी कपूर यांनी स्वत:ला क्वारंटाइन केले होते. फिल्मफेयरला दिलेल्या मुलाखतीत जान्हवीने या क्वारंटाइनचा अनुभव सांगितला आहे. या काळात तिने स्वत:ची व वडिलांची देखभाल कशी केली याबाबत चाहत्यांना सांगितले आहे.
हा व्हिडीओ पाहाच – भारतीय संस्कृतीत गायीला इतकं महत्व का आहे?
काय म्हणाली जान्हवी?
“करोनाच्या भीषणतेबाबत इतके दिवस टीव्ही आणि सोशल मीडियाद्वारे ऐकत होतो. परंतु स्वत:च्या घरातच करोनाग्रस्त सापडल्यामुळे आम्ही घाबरलो. कारण घराच्या कुंपणाबाहेर देखील कोणी गेलं नव्हतं. तरी करोना विषाणू आमच्या घरात पोहोचला होता. या प्रकरणातून आम्हाला सावरायला दोन दिवस लागले. क्वारंटाइनच्या काळात घरातील प्रत्येक जण आपापल्या खोल्यांमध्ये कैद राहायचे. माझ्या वडिलांना रात्री झोपताना गरम पाणी पिण्याची सवय आहे. त्यामुळे हातात ग्लोज आणि तोंडावर मास्क लावून मी त्यांच्याकडे पाणी घेऊन जायचे. घरातील प्रत्येक कर्मचाऱ्याला तोंडावर मास्क लावणं आता अनिवार्य केलं आहे. आता आम्ही स्वच्छतेवर अधिक लक्ष देतोय.” असा अनुभव जान्हवीने या मुलाखतीत सांगितला.
अवश्य पाहा – “अमित शाहांना धड खोटंही बोलता येत नाही”; ‘त्या’ व्हिडीओ क्लिपवरुन अभिनेत्याचा टोला
यापूर्वी जान्हवी कपूर ‘गुंजन सक्सेना- द कारगिल गर्ल’ या चित्रपटामुळे चर्चेत होती. या चित्रपटात ती कारगिल गर्ल गुंजन सक्सेना यांची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. गुंजन सक्सेना कारगिल युद्धात लढाऊ विमान उडवणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या होत्या. कारगिल युद्धात पाकिस्तानी सैन्यदलाकडून भारतीय सैनिकांवर निशाणा साधण्यात येत होता. त्या भागातूनच गुंजन यांनी लढाऊ विमान उडवत सैन्यदलातील जवानांना सुरक्षितरित्या बाहेर काढले होते. त्यामुळे त्यांच्या साहसाची गाथा या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे.