जुने हिंदी चित्रपट हा प्रत्येक भारतीयाच्या आठवणीचा एक महत्त्वाचा भाग आहे. हिंदी चित्रपटांतील याच कायमस्वरूपी स्मरणात राहिलेल्या जुन्या चित्रपटांच्या आठवणी पुन्हा ताज्या करयला आणि त्या चित्रपटांच्या चित्रीकरणाच्या वेळी घडलेले किस्से, कहाण्या दस्तुरखुद्द जावेद अख्तर यांच्याकडून ऐकण्याची संधी ‘एपिक वाहिनी’वर मिळणार आहे.
स्वत: लेखक आणि कवी असलेल्या जावेद अख्तर यांनी सत्तरच्या दशकात अनेक गाजलेल्या चित्रपटांचे कथानक आणि गाणी लिहिली आहेत. ॠषी कपूरसारखा प्रेमकथा सजविणाऱ्या नायकापासून ते अमिताभ बच्चनच्या अँग्री यंग मॅनपर्यंत विविध नायकांचा जन्म याच काळात झाला. ‘जाने पेहचाने’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या काळातील चित्रपटांच्या सेटवरच्या गमतीजमती,  किस्से ते उलगडतील.  
या कार्यक्रमातून जुन्या चित्रपटांमध्ये गाजलेले संवाद, खलनायक-नायकांच्या शैली यांच्या चुरस जन्मकथा ऐकायची संधी मिळणार आहे.