News Flash

कतरिनामुळे सलमानने जॉनशी बोलणे केले होते बंद?

'बाबुल' चित्रपटाच्या वेळी देखील त्या दोघांमध्ये वाद झाला होता.

'बाबुल' चित्रपटाच्या वेळी देखील त्या दोघांमध्ये वाद झाला होता.

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान हा सतत चर्चेत असतो. तो इंडस्ट्रीमधील आणि इंडस्ट्री बाहेरील लोकांना मदत करताना दिसतो. पण एकदा त्याचे कोणाशी भांडण झाले की तो पुन्हा त्या व्यक्तीशी बोलत नसल्याचे म्हटले जाते. एकदा सलमान खान आणि जॉन अब्राहिम यांच्यामध्ये भांडण झाले होते. हा किस्सा २००६मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बाबुल’ चित्रपटाच्या वेळचा आहे. या चित्रपटाच्या वेळी जॉन आणि सलमानची चांगली मैत्री झाली होती. ते एकत्र फिरताना वैगरे दिसत होते.

‘बाबुल’ चित्रपटानंतर सलमान आणि जॉन जवळचे मित्र झाले होते. सलमानने जॉनला ‘रॉकस्टार’ हा शो देखील ऑफर केला होता. हा एक इंटरनॅशनल टूर कॉन्सर्ट होता. या कॉन्सर्टमध्ये सलमान कधी सहभागी होणार याची चाहते आतुरतेने वाट पाहायचे. इतर कलाकारांच्या तुलनेत सलमान सहभागी झालेला शो हिट ठरायचा. पण एकदा सलमानसोबत जॉन अब्राहिमदेखील सहभागी झाला होता. जॉनचा परफॉर्मन्स चाहत्यांना प्रचंड आवडला होता. क्रू मेंबर्सने देखील जॉनची प्रशंसा केली होती.

आणखी वाचा : ‘फॅमिली प्लॅनिंगबद्दल काय विचार?’ चाहत्याच्या प्रश्नाला अंकिताचे मजेशीर उत्तर

या शोसाठी जॉनने तगडे मानधन घेतले होते. सलमानने जॉनला त्याचे मानधन कमी करण्यास सांगितले होते. पण जॉनने ऐकले नाही. दरम्यान सलमान आणि जॉनमध्ये वाद झाला होता. तसेच ‘बाबुल’ या चित्रपटाने देखील बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही. त्यावेळी सलमानने चित्रपटाचा सेकंड हाफ चांगला नसल्यामुळे चित्रपटाने कमाई केली नसल्याचे म्हटले होते. कारण चित्रपटाच्या फर्स्ट हाफमध्ये सलमान होता आणि सेकंड हाफमध्ये जॉन दिसला होता. त्यानंतर दोघांमध्ये आणखी वाद झाले. त्याच काळात सलमानच्या आयुष्यात अभिनेत्री कतरिना कैफची एण्ट्री झाली होती.

कतरिनाने जॉनसोबत एक चित्रपट साइन केला होता. पण अचानक तिला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. रिपोर्ट्सनुसार, कतरिनाने या मागचे कारण जॉन असल्याचे सांगितले होते. जॉनने तिच्यासोबत काम करण्यास नकार दिल्यामुळे कतरिनाला चित्रपटातून काढण्यात आले होते. याबाबत कतरिनाने सलमानला देखील सांगितले होते. यानंतर सलमान आणि जॉन हे कधीही एकत्र दिसले नसल्याचे म्हटले जाते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2021 10:08 pm

Web Title: john abraham and salman khan fight because of katrina kaif avb 95
Next Stories
1 “मी भारतात पाऊल ठेवताच करोना नष्ट होईल”; नित्यानंदचा अजब दावा
2 अबब… महिलेने एकाच वेळी दिला १० बाळांना जन्म; ‘गिनीज बुक’मध्ये झाली विश्व विक्रमाची नोंद
3 समजून घ्या : Positivity Rate म्हणजे काय? तो इतका का महत्वाचा असतो?
Just Now!
X