एकीकडे संपूर्ण देश करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा सामना करत असताना, आसाम राज्य पुर आणि करोना अशा दुहेरी संकटाचा सामना करत आहे. गेल्या काही दिवसांपासून आसाममध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. ब्रम्हपुत्रा नदीने आपली धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे संपूर्ण राज्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या पुरात आतापर्यंत ८५ जणांनी आपले प्राण गमावले आहेत. आसाममध्ये आलेल्या या संकटावर बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम याने प्रतिक्रिया दिली आहे.
अवश्य पाहा – “हे सारं कल्पनेच्या पलिकडलं”; मुंबईत नसतानाही अभिनेत्रीला आलं ३२ हजार वीज बिल
जॉनने आसाममधील परिस्थितीचे फोटो ट्विट करुन त्यांना त्वरित मदत करावी अशी विनंती देशवासीयांना केली आहे. त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. पूरपरिस्थितीचा राज्यातील २८ जिल्ह्यातील ३३ लाख नागरिकांना या परिस्थितीचा फटका बसला आहे. दरम्यान एनडीआरएफतर्फे बचावकार्य सुरु आहे.
Assam needs help… Urgent https://t.co/BeW6Wy3wOh pic.twitter.com/RP3jtDfJ4k
— John Abraham (@TheJohnAbraham) July 18, 2020
अवश्य पाहा – ‘गरीबांवर असा अत्याचार भारतातच होऊ शकतो’; तो व्हिडीओ पाहून अभिनेत्याची पोलिसांवर टीका
भारतीय हवामान विभागाने २१ जुलैपर्यंत राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केल्यामुळे अद्याप आसामसमोरचं संकट टळलेलं नाहीये. गुवाहटी, दिब्रुगढ, धुबरी, गोलपारा, जोरहाट, सोनीतपूर, धेमजी, लखीमपूर, बिस्वनाथ, उडलगुरी, बक्सा, नलबारी, बारपेटा, कामरुप,मोरीगाव, नागाव अशा महत्वाच्या जिल्ह्यांना पुराच्या पाण्याचा विळखा बसला आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे काही भागांत भुस्खळलानाचेही प्रकार घडले आहेत, ज्यात काही लोकांना आपले प्राण गमवावे लागले.