News Flash

‘अब तेरा रोना शुरू हो जाएगा’; करोनावर जॉनी लिव्हर यांचं भन्नाट गाणं

पाहा व्हिडीओ..

जॉनी लिव्हर

देशभरातील करोनाग्रस्तांची संख्या ही चिंता वाढवणारी आहे. करोना व्हायरसच्या नकारात्मक बातम्यांमध्ये थोडीफार सकारात्मकता लोकांमध्ये निर्माण करण्यासाठी अनेकजण प्रयत्न करत आहेत. असाच एक प्रामाणिक प्रयत्न विनोदवीर जॉनी लिव्हर यांनी केला आहे. जॉनी यांनी करोनावर भन्नाट गाणं म्हटलंय आणि त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. करोना कसा घाबरून पळून जाईल, ते या गाण्यात जॉनी लिव्हर सांगत आहेत. ‘हम हिंदुस्तानी’ या गाण्याच्या चालीवर त्यांनी करोनाचं गाणं म्हटलंय.

‘करोना अब तेरा रोना शुरू हो जाएगा.. भागेगा तू करोना.. मांगेगा ना पानी.. इंडिया मे जो घुसनेकी तू कर बैठा नादानी’, अशी या गाण्याची सुरूवात आहे. करोनाशी दोन हात करण्यासाठी सर्वजण आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. लॉकडाउनदरम्यान घरीच राहण्याचं आवाहन सेलिब्रिटी करत आहेत.

आणखी वाचा : मदतीचा हात पुढे करुनही अक्षय कुमार पिछाडीवर, पाहा लोकप्रियतेत कोणी केली मात

करोनाचा प्रसार रोखण्यासाठी जगातील साऱ्या यंत्रणा झगडत असल्या तरीही झपाटय़ाने होत असलेली नव्या रुग्णांची वाढ ही चिंताजनक ठरत आहे. देशभरात २४ तासांमध्ये ८९६ नव्या रुग्णांची भर पडली असून ३३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्युसंख्या ११० झाली असून जगातील बळींची संख्या १ लाखांवर गेली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 11, 2020 11:14 am

Web Title: johny lever song on corona will make you laugh ssv 92
Next Stories
1 ‘केदारनाथ’मधील जोडी पुन्हा एकत्र येणं अशक्य; सुशांत सिंह राजपूतचा मोठा निर्णय
2 मदतीचा हात पुढे करुनही अक्षय कुमार पिछाडीवर, पाहा लोकप्रियतेत कोणी केली मात
3 हे आहे बबड्याचं ‘क्वारंटाइन शेड्युल’
Just Now!
X