News Flash

‘कुली नंबर १’ होणार सुपरफ्लॉप? अभिनेत्याच्या ऑनलाईन सर्वेमध्ये वरुणला नापसंती

घराणेशाहीच्या आरोपांमुळे वरुण धवनचा 'कुली नंबर १' संकटात

अभिनेता कमाल आर खान आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. तो नेहमीच विविध क्षेत्रातील सेलिब्रिटींवर टीका करत असतो. यावेळी त्याने अभिनेता वरुण धवनवर निशाणा साधला आहे. वरुणचा आगाची चित्रपट ‘कुली नंबर १’ सुपरफ्लॉप होईल अशी धक्कादायक भविष्यवाणी त्याने केली आहे.

नेमकं काय म्हणाला कमाल खान?

वरुण धवनचा ‘कुली नंबर १’ हा चित्रपट किती प्रेक्षक पाहण्यास उत्सुक आहेत? असा पोल त्याने आपल्या ट्विटर अकाउंटवर केला होता. चकित करणारी बाब म्हणजे ४९.४ टक्के लोकांनी हा चित्रपट पाहणार नाही असं उत्तर दिलं. याच पोलच्या आधारावर केआरकेने ‘कुली नंबर १’ फ्लॉप होईल असा दावा केला आहे. कमाल खानचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

‘कुली नंबर १’ हा वर्षातील सर्वात मोठ्या बॉलिवूड चित्रपटांपैकी एक आहे. गेल्या वर्षीपासून या चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. या चित्रपटात वरुण सोबत अभिनेत्री सारा अली खान झळकणार आहे. हा चित्रपट गोविंदाच्या कुली नंबर १ या चित्रपटाचा रिमेक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 30, 2020 7:54 pm

Web Title: kamaal r khan coolie no 1 varun dhawan mppg 94
Next Stories
1 लाव रे तो व्हिडीओमध्ये ‘मुळशीपॅटर्न’मधील पिट्ट्याभाईची एण्ट्री
2 रिअ‍ॅलिटी स्टार बनण्यासाठी आला आहात का? फरहानची अभय देओलवर खोचक टीका
3 मायकल जॅक्सनला भेटण्यासाठी अनुपम खेर यांनी तोडले होते बॅरिकेट्स
Just Now!
X