करोनाची दुसरी लाट आल्याने देशभरात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णालयात करोनाची वाढती प्रकरणे आणि ऑक्सिजनची तीव्र कमतरतात लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्याची बैठक घेतली. त्याच वेळी ते दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या वागणुकीवर चिडले, कारण त्यांनी बैठतीत झालेल्या खासगी चर्चेचे थेट प्रसारण केले होते. बैठकीत झालेल्या खासगी चर्चेचे थेट प्रसारण केल्यानं पंतप्रधान यांनी कठोर शब्दांचा वापर करत केजरीवाल यांना सांगितले की तुम्ही महत्त्वाचा प्रोटोकॉल मोडला आहे. यानंतर मुख्यमंत्री केजरीवाल यांनी हात जोडत माफी मागितली. त्यावर आता बॉलिवूडची क्वीन कंगना रणौतने केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे.

पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांमध्ये झालेल्या या बैठकीचा व्हिडीओ बीजेपी महिला मोर्चाच्या सोशल मीडियाच्या नॅशनल इंचार्ज प्रीती गांधी यांनी त्यांच्या ट्विटरवरुन शेअर केला. “बैठकीत झालेल्या खासगी चर्चेचे थेट प्रसारण आणि महत्त्वाचा प्रोटोकॉल मोडल्यानंतर पंतप्रधानांनी फटकारल्यानंतरही अरविंद केजरीवाल हे ऐकायला तयार नाही. काय झालं ते पाहा”, असे कॅप्शन देत त्यांनी हा व्हिडीओ ट्विटरवल शेअर केला.

काय म्हणाली कंगना..

यावर कंगनाने तिची प्रतिक्रिया देत कंगनाने ट्विट केले आहे. “तुमच्या बऱ्याच चुका आहेत पण सुरुवात होते- १. सेल्फ प्रमोशनमध्ये राज्याचा पैसा खर्च करणें. २. वेगवेगळे प्रदर्शन/ दंगलींमध्ये पैशांचा वापर. ३. नि: शुल्क वीज आणि पाणी देत मतदारांना थोड्या वेळासाठी संतुष्ट करणे, दीर्घ काळासाठी काही योजना/ पायाभूत सुविधा नाही, देशाच्या राजधानीत एकही ऑक्सिजन प्लांट नाही,” असे म्हणतं कंगनाने केजरीवाल यांना टोला लगावला आहे.

यावर अनेक नेटकऱ्यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. कोणी म्हणालं की केजरीवाल है ‘भेकड’ आहेत. तर, अनेक कंगनाला ट्रोल करत म्हणाले की, ‘ही फक्त द्वेष पसरवते.’

दरम्यान, कंगनाचा ‘थलायवी’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात कंगना तामिळनाडूच्या दिवंगत माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट जयललिता यांच्या आयुष्यावर आहे. हा चित्रपट तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. यानंतर कंगना ‘तेजस’ आणि ‘धाकड’ या दोन चित्रपटांमध्ये दिसेल.