03 March 2021

News Flash

VIDEO: …जेव्हा कपूर बहिणी हिलरी क्लिंटनची प्रतीक्षा करतात

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

करिना कपूर, करिष्मा कपूर

सेलिब्रिटी बहिणींमध्ये कपूर घराण्याच्या करिना आणि करिष्मा कपूर ही जोडी नेहमीच चर्चेत असते. विविध कार्यक्रमांमध्ये या बहिणींची एकत्र उपस्थिती असो, सोशल मीडियावरील दोघींचे एकत्रित फोटो असो, करिना आणि करिष्मा या बहिणींचे प्रेम कॅमेरासमोर अनेकांनीच पाहिले. किंबहुना यांना बॉलिवूडच्या ‘मोस्ट हॅपनिंग सिस्टर्स’ म्हणून संबोधित केलं तरी वावगं ठरणार नाही. दोघींचा एक गमतीशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

करिना आणि करिष्माने नुकत्याच एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या खास कार्यक्रमाला बरेच दिग्गज उपस्थित होते. मात्र, कार्यक्रमापूर्वी एका व्यक्तीसाठी या दोघी बहिणींना बाहेर प्रतीक्षा करत उभे राहावे लागले. तेव्हाचाच हा व्हिडिओ आहे. एखाद्याची वाट पाहत उभे असताना कसे वाटते, हे करिना या व्हिडिओत गमतीशीर पद्धतीने सांगताना पाहायला मिळत आहे. ‘एका पाहुण्याची आम्ही वाट पाहत उभे आहोत. खूपच छान वाटतंय आणि एखाद्याची प्रतिक्षा करत उभे असताना कसं वाटतं हे आता आम्हालाही समजतंय,’ असं करिना म्हणतेय. तर या व्हिडिओत करिनासुद्धा झळकत आहे.

वाचा : मराठी गायिकेचा फेसबुक अकाऊंट हॅक

या दोघी बहिणी ज्या खास व्यक्तीसाठी उभ्या होत्या, ती व्यक्ती म्हणजे हिलरी क्लिंटन. अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होत्या आणि त्यांचीच प्रतिक्षा करिना- करिष्मा करत होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2018 1:46 am

Web Title: kareena and karisma kapoor wait for hillary clinton and it is hilariously adorable watch video
Next Stories
1 VIDEO: …जेव्हा सेटवर अचानक ‘धकधक गर्ल’ अवतरते
2 फ्लॅशबॅक : कमल हसनचा ‘करिश्मा’…
3 Top 10 News: यशराज स्टुडिओला पालिकेच्या नोटीसपासून ते जेम्स बॉन्डपर्यंत
Just Now!
X