News Flash

मिथुन चक्रवर्ती यांची तब्येत बिघडली; चित्रपटाचं शूटिंग थांबवलं

मसूरी या ठिकाणी सुरू होतं चित्रपटाचं शूटिंग

मिथुन चक्रवर्ती यांची तब्येत बिघडली; चित्रपटाचं शूटिंग थांबवलं

ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची तब्येत बिघडल्याने आगामी ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाचं शूटिंग थांबवण्यात आलं. नोव्हेंबरपासून मसूरी या ठिकाणी या चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं. ‘मिड डे’नं दिलेल्या वृत्तानुसार शनिवारी आऊटडोअर शूटिंगदरम्यान मिथुन चक्रवर्ती अचानक सेटवर कोसळले. त्यानंतर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी लगेच चित्रपटाचं शूटिंग थांबवलं.

“चित्रपटातील साहसदृश्याचं शूटिंग सुरू होतं आणि मिथुन सरांच्या भूमिकेला विशेष महत्त्व होतं. मात्र फूड पॉइझनिंगमुळे त्यांना उभंसुद्धा राहता येत नव्हतं. थोडा वेळ ब्रेक घेऊन त्यांनी त्यांचं शूटिंग पूर्ण केलं. त्यांना आराम करण्याची खूप विनंती केली पण चाळीस वर्षांहून अधिक करिअरमध्ये कधीच कोणत्या चित्रपटाच्या सेटवर आजारी पडलो नसल्याचं त्यांनी मला सांगितलं. काहीही झालं तरी शूटिंग थांबलं नाही पाहिजे यावर ते ठाम होते”, असं विवेक अग्निहोत्री म्हणाले.

मिथुन चक्रवर्ती यांच्यावरील भागाचं शूटिंग झाल्यानंतर त्या दिवसाचं काम बंद करण्यात आलं. त्यांना पुरेसा आराम मिळावा याची पूर्ण काळजी घेण्यात आली. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटात अनुपम खेर, पुनित इस्सार यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 21, 2020 9:41 am

Web Title: kashmir files shoot comes to halt after mithun chakraborty complains of ill health ssv 92
Next Stories
1 इंग्रजी संवादांमुळे ‘फनी बॉय’ चित्रपट ऑस्कर अकादमीने नाकारला
2 अरेच्चा… हे काय! सनी लिओनीचा चक्क रिक्षातून प्रवास; व्हिडीओ झाला व्हायरल
3 तैमूरने काढला हातावर टॅट्यू, वाढदिवशी व्हिडीओ व्हायरल
Just Now!
X