02 March 2021

News Flash

पहिल्यांदाच शोमध्ये बंद झाला एक्सपर्टचा आवाज, अमिताभ बच्चन यांनी लढवली अनोखी शक्कल

जाणून घ्या सविस्तर...

माहितीचा स्त्रोत म्हणून पाहिला जाणारा छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो म्हणजे ‘कौन बनेगा करोडपती.’ बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन सूत्रसंचालन करत असलेला हा शो कायमच चर्चेत असतो. बिग बी आणि स्पर्धकांमधील संवाद पाहणे प्रेक्षकांना विशेष आवडते. पण नुकताच पार पडलेल्या एका भागामध्ये पहिल्यांदाच तांत्रिक अडचणीमुळे एक्सपर्टचा आवाज येणे बंद झाले होते. पण अमिताभ यांनी लगेच परिस्थिती सांभाळून घेतली.

कौन बनेगा करोडपती या शोमध्ये हॉट सीवर बसलेल्या स्पर्धकाला खेळ खेळताना चार लाइफलाइन देण्यात येतात. त्यातील एक म्हणजे एक्सपर्ट अॅडव्हाइस. एक्सपर्टस नेहमी स्पर्धकांना येत नसलेल्या प्रश्नाचे योग्य उत्तर देत रक्कम जिंकण्यास मदत करतात. मात्र पहिल्यांदाच असे घडले आहे की स्पर्धकाची मदत करणाऱ्या एक्सपर्टचा आवाज तांत्रिक अडचीमुळे स्पर्धकापर्यंत पोहोचू शकला नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sony TV UK (@sonytvuk)

आणखी वाचा- ‘…मला थंडीपासून वाचवू शकला नाही’; बिग बींच्या पोस्टची सोशल मीडियावर चर्चा

शो मध्ये विवेक कुमार हे हॉट सीवर बसले होते. त्यांना एका प्रश्नाचे उत्तर माहिती नसल्यामुळे त्यांनी एक्सपर्ट अॅडव्हाइस ही लाइफलाइन वापरण्याचा निर्णय घेतला. पण एक्सपर्टला केवळ अमिताभ यांचाच आवाज ऐकू जात होता. ते पाहून बिग बींनी इशाऱ्यांनी योग्य उत्तराचा पर्याय सुचवण्यास सांगितले. शोमध्ये तांत्रिक अडचणीवर बिग बींनी मात करत शो सुरळीत पार पाडला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 7, 2021 2:28 pm

Web Title: kbc 12 amitabh bachchan rescued contestant during technical glitch avb 95
Next Stories
1 बच्चन पांडेसाठी अक्षय कुमारचा राऊडी लूक; फोटो पाहून व्हाल चकित
2 सैफने रावणाविषयी केलेल्या वक्तव्यावर ‘आदिपुरुष’च्या संवाद लेखकाने मांडले मत
3 डाव मांडते भीती…. अमृता फडणवीस यांचं नवीन गाणं
Just Now!
X