02 March 2021

News Flash

चहा-कॉफीसाठी मोजले ७८,६५०/- ; तरीसुद्धा किकू शारदाने केली नाही तक्रार, कारण…

पंचतारांकित हॉटेलमध्ये मिळणाऱ्या खाद्यपदार्थांवर अव्वाच्या सव्वा रुपये आकारले जात असल्याचा आरोप काही कलाकारांनी केला होता.

कॉमेडियन किकू शारदा

पंचतारांकित हॉटेलमध्ये मिळणाऱ्या खाद्यपदार्थांवर अव्वाच्या सव्वा रुपये आकारले जात असल्याचा आरोप काही कलाकारांनी केला होता. अभिनेता राहुल बोसने दोन केळ्यांसाठी आकारलेल्या ४४० रुपयांच्या बिलचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर हा मुद्दा चर्चेत आला. कॉमेडियन किकू शारदाने नुकताच एका हॉटेलमधील बिल सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. फक्त एक कप चहा व कॉफीसाठी आकारलेला बिल पाहून तुमचेही डोळे विस्फारतील. पण किकू मात्र याबाबत अजिबात तक्रार करत नाहीये. यामागचं कारणंही तितकंच रंजक आहे.

किकू सध्या इंडोनेशियातील बाली येथे सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. तिथल्या एका हॉटेलमध्ये त्याने एक कप कॅपुचिनो व एक कप चहा मागवला. त्यासाठी त्याला तब्बल ७८,६५० इतका बिल आला. पण तिथले चलन हे इंडोनेशियन रुपया असल्याने त्याचे भारतीय चलनात रुपांतर केल्यास केवळ ४०० रुपये इतका बिल होतो. या पोस्टवरून किकूची विनोदबुद्धी पुन्हा एकदा दिसून आली आहे.

Photo : ‘बिग बॉस’साठी ड्रामा नव्हे तर खऱ्याखुऱ्या आयुष्यातही शिव-वीणा एकत्र

राहुल बोसने चंदीगडमधील पंचतारांकित हॉटेलच्या बिलचा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर पंजाब सरकारने त्याची दखल घेतली. संबंधित हॉटेलला २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2019 5:39 pm

Web Title: kiku sharda charged huge amount for a cup of coffee and tea but he is not complaining here is why ssv 92
Next Stories
1 Photo : ‘बिग बॉस’साठी ड्रामा नव्हे तर खऱ्याखुऱ्या आयुष्यातही शिव-वीणा एकत्र
2 नवऱ्याबरोबर ‘ती’ गोष्ट शक्य नाही; विद्याने दिले नवऱ्याबरोबर काम न करण्याचे कारण
3 एस्कॉर्ट सर्व्हिसच्या पोस्टरवर छापला फोटो व नंबर; अभिनेत्रीची पोलिसात धाव
Just Now!
X