अभिनेता राहुल वोहरा हा ओटीटी प्लॅटफॉर्मवरील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक होता. काल ९ मे रोजी अभिनेता राहुल वोहरा याचे करोनाने निधन झाले आहे. राहुलला करोनाची लागण झाली होती. त्याच्या निधनानंतर अनेक सेलिब्रिंटींनी सोशल मीडियावर त्याला श्रद्धांजली वाहिली आहे. दरम्यान, लोकप्रिय अभिनेत्री किश्वर मर्चेंटची पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.

ज्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन राहुलच्या निधनाची बातमी सांगण्यात आली होती. त्या पोस्टवर किश्वरने कमेंट केली आहे. “माझी इच्छा आहे की राहुलचा मेसेज हा सोनू सूद पर्यंत पोहोचला असता..तर आज परिस्थिती वेगळी असती. मी राहुलच्या कुटुंबासाठी प्रार्थना करते. या कठीण क्षणी देव त्यांना शक्ती देवो,” अशा आशयाची कमेंट किश्वरने केली आहे.

राहुलने काय पोस्ट केली होती?
राहुलने मृत्युपूर्वी त्याच्या फेसबूकवर एक पोस्ट शेअर केली होती. त्या पोस्टमध्ये त्याने मदत मागितली होती. ”जर माझ्यावर चांगले उपचार झाले असते तर मी वाचू शकलो असतो, मी लवकरच जन्म घेईल आणि चांगले काम करेल. आता माझ्यातील धैर्य संपले आहे, अशा आशयाची पोस्ट राहुलने केली होती,” अशी पोस्ट राहुलने फेसबूकवर केली होती.

आणखी वाचा : “…तर मी पण वाचलो असतो”, फेसबुक पोस्टनंतर काही तासातच युट्युबरचा मृत्यु

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राहुल हा मुळचा उत्तराखंडचा होता. राहुल हा ओटीटी प्लॅटफॉर्मवरील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक होता. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील ‘फ्रीडम’ या वेबसीरिजमध्ये तो दिसला होता. या वेबसीरिजमधील त्याची भूमिका ही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.